शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

204, चर्नी रोड

By admin | Updated: December 31, 2016 13:21 IST

बिनबाह्यांच्या बनियनमधले जॉर्ज फर्नाडिस, चाबरट पोरांची झुंड, कुलकण्र्याची भजी आणि एक वेडं वादळ..

- निमित्त

- निळू दामले

ही इमारत ‘२०४, चर्नी रोड’ या नावानं ओळखली जात असे. १९६७ ची स. का. पाटील यांना हरवणारी ऐतिहासिक निवडणूक जॉर्ज फर्नांडिस यांनी इथून लढवली. या इमारतीत हिंदू मजदूर पंचायत, बॉम्बे लेबर युनियन, म्युनिसिपल मजदूर युनियन इत्यादि अनेक कामगार संघटनांच्या कचेऱ्या असत. संयुक्त समाजवादी पक्षाचंही कार्यालय इथंच होतं. जॉर्ज इथंच बसत. याच इमारतीत जॉर्ज यांची कामगार चळवळ कारकीर्द आकाराला आली. असं सांगतात की जॉर्ज मुंबईत प्रथम आले तेव्हा गोदीबाहेरच्या फुटपाथवर राहत आणि या कचेरीत येत. नंतर यथावकाश ते हाकेच्या अंतरावर ह्यूजेस रोडवरच्या पानगल्लीतल्या एका छोट्या घरात राहायला गेले.इमारतीच्या तळ मजल्यात एक बँक होती. तिथं फारशी गर्दी दिसत नसे. जी काही गर्दी असे ती पहिल्या मजल्यावर. सुरुवातीच्या चार-पाच पायऱ्या चढून गेल्यावर मुख्य अंधारी जिना सुरू होई.पहिल्या मजल्यावर पोचल्यावर समोर एक मोठ्ठा हॉल. समोरच्या भिंतीला लागून विविध युनियनचे सेक्रेटरी बसत. सातव, शेट्टी, एम. यू. खान, सोमनाथ डुबे. डाव्या हाताच्या भिंतीशी मेंडोसा. काही वेळा अण्णा साने. उजव्या बाजूच्या भिंतीशी शरद राव, गोपाळ शेट्टी, आणि महाबळ शेट्टी. त्यांच्या समोर टेबलं. टेबलांसमोर बाकं. बाकांवर बसत भेटायला आलेले कामगार. डाव्या हाताला एक खोली, तिथं जॉर्ज फर्नांडिस बसत असत. समाजवादी मंडळीतली पद्धत अशी की माणूस वयानं आणि कीर्तीनं कितीही मोठा असला तरी त्याचा एकेरी उल्लेख केला जात असे. त्यामुळं जॉर्ज आलाय का, जॉर्ज काय करतोय, जॉर्जकडं कोण बसलंय असे उल्लेख होत. जॉर्ज दुपारी कधी तरी आॅफिसमध्ये पोचत. खोलीत एका खिडकीशी जॉर्जची खुर्ची आणि समोर भलं मोठं टेबल. त्या टेबलाभोवती, खोलीभर कामगार बसलेले किंवा उभे असत. टेबलावर लोखंडी काडीवर लावलेला भारताचा झेंडा. उकाडा. डोक्यावर गरगरणारा पंखा. जॉर्ज खुर्चीवर बसायच्या आधी शर्ट काढून ठेवत असत. बिनबाह्यांच्या बनियनमध्येच सर्वांना भेटत. निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर होण्याच्या आधीच जॉर्ज ही प्रसिद्ध व्यक्ती असल्यानं देशी आणि विदेशी पत्रकार जॉर्जची मुलाखत घ्यायला येत. जॉर्ज बिनबाह्यांच्या बनियनमध्येच मुलाखती देत.जॉर्जचे एक सहकारी जगन्नाथ जाधव म्हणत, ‘छतावरच्या पंख्यात एक पॉवरफुल मॅग्नेट आहे, दुनियाभरचे मॅड लोकं त्या मॅग्नेटकडं आकर्षित होतात.’१९६६-६७ हा काळ या जागेचा धामधुमीचा आणि सुवर्णकाळ होता. जॉर्जनी स. का. पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवायचा निर्णय घेतला तो इथूनच. ही जागा निवडणुकीचं मुख्य कार्यालय होतं. दिवस-रात्र कार्यकर्त्यांचा राबता असे. दिवसरात्र बैठका. जॉर्जचे कामगार चळवळीतले सहकारी मोहीम आखत होते. काही तरी फार महत्त्वाचं घडतंय असं वातावरण असे. कोण काय बोलतंय ते नीट कळत नसे. कारण त्या हॉलमध्ये अनेक गट असत आणि कलकलाट असे. म्युनिसिपल मजदूर युनियनचे बाळ दंडवते आणि बेस्ट वर्कर्स युनियनचे नारायण फेणाणी ही माणसं (इतरही कित्येक) लक्षात राहण्यासारखी प्रमुख माणसं होती. ‘तुम्ही स. का. पाटलांना पाडू शकता’ ही घोषणा दंडवतेंनी तयार केली होती असं म्हणतात. दंडवते मिश्कील माणूस होता. शीर्षकं, घोषणा, एका ओळीची चमकदार वाक्य हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. डोळे मोठे करून ते गंभीरपणे एखादं चमकदार वाक्य टाकत आणि हास्याचा फवारा उडे. नारायण फेणाणींच्या तोंडातल्या पानाच्या तोबऱ्यातून वाट काढून मोलाचे आणि वल्ली सल्ले बाहेर पडत. या माणसांच्या सहवासात निवडणुकीचे ताणतणाव खलास होत. निवडणूक मोहीम जसजशी गती घेऊ लागली तसं या हॉलमधल्या गर्दीचं रूप बदलू लागलं. कामगारांसोबत मध्यमवर्गी माणसं दिसू लागली. त्यातही गुजराथी माणसांचं प्रमाण उठून दिसावं इतकं वाढू लागलं. तरुणांची गर्दी वाढली.कार्यालयात ही सगळी धामधूम चालली असताना जॉर्ज तिथं असतच असं नाही. ते केव्हा येऊन जात तेही लक्षात नसे. ही निवडणूक जॉर्जची नव्हतीच, ती तमाम लोकांची होती. स. का. पाटील आणि त्यांची काँग्रेस पार्टी यावर लोकांचा राग होता, त्या रागाला जॉर्जनी तोंड फोडलं होतं. जॉर्जची निवडणूक म्हणजे एक मोठ्ठी सामाजिक घटनाच झाली होती. माणसं बोलता बोलता दमून भुकावली की समोरच्या कुलकर्ण्याच्या हॉटेलात जाऊन भजी खात. संध्याकाळी पोस्टर्सचे गठ्ठे येऊन पडत. कार्यकर्ते गोळा होत. गिरगावात आसपास राहणारे तरुण कार्यकर्ते. मराठी, गुजराथी, मारवाडी असा मिश्र गट. रात्रीचे दहा वाजून गेले की आसपासच्या हॉटेलात कामं करणाऱ्या पोरांची झुंड हजर होत असे. ही पोरं युनियनचं काम करत. दक्षिण आणि उत्तर भारतातून स्थलांतरित झालेली. मुंबईत त्यांना घर नसे. दिवसभर हॉटेलात काम आणि रात्री हॉटेलची साफसफाई करून तिथंच झोपणं. उन्हाळ्यात उकडत असे. ही पोरं रस्त्यावर पथाऱ्या पसरून गप्पा करत झोपत. हॉटेलात काम करणाऱ्यांची जॉर्जनी बांधलेली युनियन जगातली अपूर्व युनियन होती असं त्या काळात पेपरात छापून आलं होतं. पोरं जोशात असायची. शेट्टी हा त्यांचा संघटक त्या पोरांना घेऊन पोस्टर लावायला निघायचा. काही ठिकाणी पोस्टर लावायला विरोध व्हायचा. विरोध करणारे सका पाटलांचे समर्थक असावेत. मग ही चाबरट पोरं तिथं राडा करायची. राड्याला घाबरून विरोधक पळून जायचे. पोरं तोडफोडही करायला कमी करत नसत. त्यांना त्यात मजा यायची.मतदारसंघात एक मोठी वेश्या वस्ती होती. तिकडं पोस्टर लावायला जाण्याचा काहींचा आग्रह असे. विशेषत: हॉटेलमध्ये काम करणारी मुलं. पोस्टरं लावायच्या नादात खिडक्यांतून आत डोकवायचं आणि खी खी हसायचं. पोस्टरं लावून झाली की प्रार्थना समाजाच्या नाक्यावर पावभाजीच्या गाड्याभोवती झुंड गोळा व्हायची. रात्रीचे सहज एक दोन वाजलेले असायचे. पावभाजीच्या गाड्यावर पाणी मिळायचं. त्या पाण्यानं चिकटलेली खळ खरवडून खरवडून हात धुवायचे आणि पावभाजी खायची. नंतर छोट्या काचेच्या ग्लासातली कटिंग कॉफी. काही पोरं पुन्हा कचेरीत परतायची, तिथं घुटमळायची. काहीजणं तिथंच झोपायची. सकाळी गोळा होणारी कार्यकर्त्यांची गर्दी या पोरांना जागं करायची.वातावरण जाम भारलेलं. कचेरीत बातम्या यायच्या. अमुक ठिकाणी आपल्या सभेवर दगडफेक झालीय, तमुकठिकाणी सभा उधळायचा प्रयत्न झालाय. मग कार्यकर्त्यांची झुंड तिकडं सुसाट निघायची. कार्यालयात गजबज असताना तिकडं जॉर्ज आसपासच्या प्रत्येक इमारतीत जाऊन नागरिकांना व्यक्तिगत भेटत फिरायचे. बंदसम्राट जॉर्ज म्हणजे राक्षस आहे अशी लोकांची समजूत असे. कुठल्याही कार्यालयात काम करणाऱ्या माणसासारखे पँट शर्ट घातलेले जॉर्ज समोर उभे पाहिल्यावर लोकांना आश्चर्य वाटत असे. जॉर्जच्या सोबत कधी कधी रामदास संघवी नावाचा माणूस असे. गुजराथी व्यापारी. तो जॉर्जवर फिदा. एकंदरीतच गुजराथी प्रजा जॉर्जवर फार प्रेम करत असे. विशेषत: तरुण मुली आणि बायका. तर हा माणूस कोणाच्याही दारात उभा राहिला की चक्क लोटांगण घालत असे. गुजराथी वळणाच्या मराठीत स्वत:चं नाव सांगे आणि जॉर्जना मत ‘दियायलाच पायजे’ असं म्हणत असे. स्वच्छ कडक इस्तरी केलेली पांढरी पँट आणि शर्ट घातलेला व्यापारी आहे असं दिसणारा हा माणूस पाया पडू लागला की लोकांची पंचाईत होत असे. पाया पडण्याचा कार्यक्र म आटोपला की हा माणूस कार्यालयात येई. एक शिवी प्रेमळपणे हासडून लोकांना जमा करे आणि कुलकर्ण्याची भजी खायला नेई. मतदानाच्या दिवशी कार्यालयात खास बैठक झाली. बैठक कसली, तुडुंब गर्दीतली एक चर्चा झाली असं म्हणायचं. सका पाटील मतपेट्या पळवतात अशी ख्याती असल्याचं कोणीतरी सांगितलं. पाटलांनी हेच तंत्र वापरून आजवरच्या निवडणुका जिंकल्यात असं लोकं बोलत होती. तेव्हा मतपेट्यांचं संरक्षण करण्याची आपली जबाबदारी आहे असं जमलेल्या गर्दीनं ठरवलं. आपलं आपणच मतदान केंद्राच्या इमारतीच्या भोवती पहारा करण्याचं ठरलं. कार्यकर्त्यांनी आपसात केंद्र वाटून घेतली आणि रवाना झाले. पाटील हरले. कार्यालयासमोर नुसता जल्लोष झाला. लोकांनीच जल्लोष केला. द. मुंबई मतदारसंघातले सर्व नागरिक कार्यकर्ते झाले होते. आपले आपणच पेढे वाटत होते, मिठाई वाटत होते, फटाके उडवत होते. सारं काही परस्परच घडत होतं. २०४, चर्नी रोड ही इमारत तेव्हा सगळ्या मुंबईच्या नजरेत भरली. पुढली कित्येक वर्षं या इमारतीवरून जाणारे येणारे इमारतीकडं बोट दाखवून ‘जॉर्ज फर्नांडिसचं आॅफिस’ असं कौतुकानं म्हणत. जॉर्ज फर्नांडिस खासदार झाले. दिल्लीत गेले. नंतर आणीबाणीत तुरु ंगात गेले. नंतर त्यांनी बिहारमधून निवडणूक लढवली. या कार्यालयातला त्यांचा वावर संपला. संपत गेला, संपत गेला आणि संपला. जॉर्ज फर्नांडिसांचा या कचेरीतला वावर संपला. ज्या कामगार चळवळीत आणि राजकीय पक्षात ते वाढले तिथलाही वावर संपला. हळूहळू कामगार चळवळ थंडावली. जॉर्जचे सहकारी वारत गेले. हे कार्यालय ओकंबोकं झालं....आता येत्या काही दिवसांत त्या कार्यालयाच्या जागी एक नवी इमारत उभी राहील, असं ऐकतो.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत) damlenilkanth@gmail.com