शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्राणिसंग्रहालयात मानधनावर सहा पदे

By admin | Updated: June 5, 2017 00:41 IST

बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ अ‍ॅनिमल कीपर नियुक्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : गेल्या वर्षभरात घडलेल्या अनेक घडामोडी, मृत झालेले साप, पक्ष्यांची झालेली हेळसांड त्यातूनच झालेली सर्पोद्यानाची बदनामी हे पाहता बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये पूर्णवेळ अ‍ॅनिमल कीपर नियुक्त करण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे घेण्यात आला आहे. मुलाखत पद्धतीने एकूण सहा पदे भरण्यात येणार असून, त्यांना एकत्रित मानधन देण्यात येणार आहे.संभाजीनगर, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय आहे. वर्षभरापासून या प्राणिसंग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यानच्या काळात अनेक घडामोडी या प्राणिसंग्रहालयामध्ये घडल्या आहेत. सर्पमित्रांना मानववस्तीत सापडलेले आणि प्राणिसंग्रहालयात आणून देण्यात आलेले अनेक सर्प एका पोत्यामध्ये मृतावस्थेत सापडले. कित्येक पक्ष्यांची अन्न-पाण्याविना दुरवस्था झाल्याचे निर्दशनास आले. त्यावर केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढून हे प्राणिसंग्रहालय बंद का करू नये, अशी नोटीस बजावली. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महापालिका प्रशासनाने सीझेडएच्या नियमावलीचे पालन करण्याचे ठरविले आहे. या प्राणिसंग्रहालयामध्ये अ‍ॅनिमल कीपर हे पद पूर्णवेळ नियुक्त असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश सीझेडएने दिले आहेत. त्याचप्रमाणे सीझेडएने नोंदविलेल्या काही आक्षेपार्ह गोष्टींची पूर्तता करणेही गरजेचे आहे. त्यानंतरच या प्राणिसंग्रहालयाला २०१८पर्यंत सीझेडएची मान्यता मिळणार आहे.प्राणिसंग्रहालय सुरू ठेवणे किंवा चालविणे यासाठी सीझेडएची मान्यता मिळविणे महापालिकेला बंधनकारक आहे. त्यासाठी सीझेडएने नमूद केलेल्या पदांचा समावेश महापालिकेतर्फे शासनाकडे सादर केलेल्या आकृतिबंधात केला. त्यामध्ये या अ‍ॅनिमल कीपर पदाचाही समावेश आहे. मात्र, आकृतिबंधास मान्यता मिळेपर्यंत ही पदे मानधन तत्त्वावर भरण्याचा निर्णय महापालिका पशुवैद्यकीय विभागाने घेतला आहे.एकूण सहा पदे भरण्यात येणार असून, त्यासाठी दहावी पास ही किमान शैक्षणिक पात्रता असून, बारावी असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इच्छुक उमेदवारांकडे वन्यजीव क्षेत्राची आवड, या विषयीचे सामान्य ज्ञान आणि कौशल्य असायला हवे. प्राणिसंग्रहालयातील कामकाजाचा, वन्यजीव हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देणार आहे.