मुंबई : कौटुंबिक वादातून जन्मदात्याने आपल्या पाच वर्षांच्या चिमुरडीचा बळी घेतल्याची घटना वडाळ्यात उघडकीस आली. मीनल अशहाद खान असे मुलीचे नाव आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.भायखळा पश्चिमेकडील साखळी स्ट्रीट परिसरात मीनल कुटुंबीयांसोबत राहायची. २१ जुलै रोजी वडिलांनी तिला नाल्यात फेकून दिले. घटनेच्या काही दिवसांनंतर तिचा मृतदेह न्हावाशेवा येथील नाल्यात सापडला. प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून तिच्या वडिलांनी तिला नाल्यात फेकल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शुक्रवारी वडाळा पोलीस ठाण्यात अशहाद खानविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा न्हावाशेवा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास न्हावाशेवा पोलीस करणार आहेत. घटनेनंतर पसार झालेल्या अशहाद खानचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
जन्मदात्यानेच घेतला चिमुरडीचा जीव
By admin | Updated: July 31, 2016 01:48 IST