शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कोब्राच्या विषाची तस्करी करणारे जेरबंद

By admin | Updated: March 21, 2017 16:32 IST

कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी

 ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 21 -  कोब्रासारख्या खतरनाक सापाच्या जहाल विषाची तस्करी करणा-या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याकडून लाखोंचे विष आणि इनोव्हा कार जप्त केली. रोशन गिरीधर अमृतवार (वय १९) आणि गोपालसिंग रेनसिंग गौर (वय ३३)अशी या दोघांची नावे आहेत. रोशन तळोधी बाळापूर (नागभिड, जि. नागपूर) आणि गौर हुडकेश्वर (नागपूर) येथील रहिवासी आहे. साप आणि त्याच्या विषाची तस्करी करणा-या आंतरराष्टीय रॅकेटसोबत या दोघांचे संबंध असल्याचा संशय आहे.हिंगण्याच्या नोगा कंपनीजवळ पांढ-या रंगाची इनोव्हा कार (एमएच ३१/ सीव्ही ७३१९) बराच वेळेपासून उभी असल्यामुळे एमआयडीसी पोलिसांना संशय आला. त्यांनी कारमध्ये बसलेल्या रोशन आणि गौर यांना विचारपूस करताच ते असंबंध उत्तरे देऊ लागले. त्यामुळे त्यांच्यावरील संशय बळावला. पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्यात छोट्या बॉटल्स (टेस्ट ट्यूब बॉटल) मध्ये विशिष्ट द्रव भरून दिसला. त्याबाबत पोलिसांनी या दोघांना विचारणा केली असता त्यात सापाचे विष असल्याचे त्यांनी सांगितले. हे विष विकायला आणल्याचीही आरोपींनी कबुली दिली. त्यामुळे ठाणेदार सुनील महाडिक, सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक रमेश तायडे, हवलदार पप्पू यादव, दिनेश जुगनाके, सुशील श्रीवास्तव आणि आशिष दुवे यांनी या दोघांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेले. तेथे त्यांची रात्रभर चौकशी केल्यानंतर प्रकरण वनविभागाच्या अधिका-यांच्या अख्त्यारितील असल्याचे लक्षात आल्यामुळे या दोघांना वनाधिका-यांच्या हवाली करण्यात आले. विष कोब्रा आणि रशल विपरचेसूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेले विष कोब्रा आणि रशल विपर या खतरनाक सापाचे असल्याचे समजते. त्याची किंंमत किमान दहा लाख रुपये असावी, असा अंदाज आहे. पकडण्यात आलेल्या या दोघांचे धागेदोरे सावनेरच्या साप तस्करांशी जुळले असल्याचा संशय आहे. आरोपी रोशनने दहावीची परिक्षा देत असल्याचे सांगून कारवाई करू नका, अशी पोलिसांना विनंती केली. त्यांनी हे विष कुठून, कुणाजवळून आणले आणि ते कुणाला विकणार होते, त्याबाबतची माहिती अद्याप उघडड झालेली नाही. मंगळवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी वनविभागाच्या अधिका-यांना सोपविले. आता या दोघांची चौकशी वनाधिकारी करीत असून, या प्रकरणात आणखी काहींना अटक होण्याची शक्यता संबंधित सूत्रांनी वर्तविली आहे.