शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतर्फे साडेतीन लाख वृक्षलागवड

By admin | Updated: July 2, 2016 01:53 IST

जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणेमार्फत सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३ लाख २७ हजार ५५३ वृक्षलागवड करण्यात आली होती.

पुणे : जिल्ह्यात शुक्रवारी सर्वत्र वृक्षलागवड करण्यात आली असून जिल्हा परिषद व पंचायत समिती यंत्रणेमार्फत सायंकाळी ४ वाजेपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार ३ लाख २७ हजार ५५३ वृक्षलागवड करण्यात आली होती. वनआच्छादन ३३ टक्के असणे गरजेचे आहे. ज्या ठिकाणी वन कमी आहेत तेथे पर्यावरणाचा समतोल ढासळतो व पाऊस कमी पडतो आणि पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यामुळे शासनाने शासनाने ३१ मार्च २०१६ रोजी आदेश काढून १ ते ७ जुलैदरम्यान वनमहोत्सव आयोजिण्यात येणार असून त्याअंतर्गत १ जुलै रोजी २ कोटी वृक्षलागवड करण्याचे ठरविले असल्याचे कळविले होते. जिल्हा परिषदेला शासनाने २ लाख ३८ हजार ७६९ इतक्या वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी व कृषी अधिकारी यांनी संबंधित यंत्रणांना सूचना देऊन वृक्षलागवडीचे आवाहन केले होते. त्यानुसार एकही शासकीय जागा वृक्षलागवडीतून शिल्लक राहू नये, अशा सूचना दिल्या होत्या. त्या जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, पशुसंवर्धन दवाखाने, लघुपाटबंधारे विभागाच्या सर्व जागांवर वृक्षलागवड करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी खरिपाच्या घेतलेल्या तालुकानुसार बैैठकांमध्ये वृक्षलागवडीसाठी आवाहन केले होते. (प्रतिनिधी)।आज जिल्ह्यात शासकीय जागांवर सर्व ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली असून, ३ लाख २७ हजार ५३३ इतकी वृक्षलागवड केल्याचे जिल्हा परिषद कृषी अधिकारी सुनील खैरनार यांनी सांगितले. सायंकाळी ४ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार मावळ तालुक्यात सर्वाधिक ५९ हजार व सर्वांत कमी पुरंदर तालुक्यात १२ हजार वृक्षलागवड करण्यात आली होती.