शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद चिक्कीच घेणार

By admin | Updated: February 16, 2016 01:34 IST

गेल्या वर्षी गाजलेल्या चिक्की घोटाळ्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने मात्र चिक्कीच घेणार, असा दावा केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेच्या हमीवर खरेदीला मंजुरी दिली असून

पुणे : गेल्या वर्षी गाजलेल्या चिक्की घोटाळ्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने मात्र चिक्कीच घेणार, असा दावा केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेच्या हमीवर खरेदीला मंजुरी दिली असून १ कोटी ९० लाख रुपयांच्या चिक्की खरेदी करणार आहे.चिक्की खरेदीवरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र चिक्कीची गुणवत्ता कोठेही तपासा असे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील निर्विकार उद्योगसमूह आणि पुण्यातील ठाकूर फुड प्रॉडक्टस्ची निविदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र यामुळे लोणावळा चिक्कीच खरेदीचा दावा संपला आहे.लोणावळा येथील मगनलालने प्रतिकिलो २२२ रुपये दर निविदेत भरला होता, तर निर्विकार आणि ठाकूर यांचा दर १६८ रुपये किलो असल्याने या दोघांकडून समान रकमेची चिक्की खरेदी होणार आहे. या खरेदीच्या ई-निविदा आज मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आली होती.मात्रण नगरच्या चिक्कीवरून गेल्या वर्षी राज्यात मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे गुणवत्ते व दर्जाबाबात शिवसेना सदस्य कुलदीप कोंडे, माऊली खंडागळे, आबा सायकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पूर्णपणे शास्त्रीय तपासणी आणि गुणवत्तेची चाचणी करून ही चिक्की खरेदी होत आहे. दर्जामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. तुम्ही चिक्की कोठेही तपासा असे आव्हान दिल्यानंतर अखेर मंजुरी मिळाली. (प्रतिनिधी)२५ हजार विद्यार्थ्यांना सायकलीजिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या सायकलखरेदीची ई निविदेला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मुलांसाठी रवि इंडस्ट्रीज, लुधियाना यांची ३५०० रुपये आणि मुलींसाठी कोहिनूर सायकल, लुधियाना यांची ३३५८ रुपये किंमतीची सायकल खरेदी करण्यात आली आहे. येत्या मार्चपूर्वी विद्यार्थ्यांना या सायकली मिळणार आहेत.