शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांना मिळणार प्राध्यापक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2016 16:01 IST

जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.

ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 25 - जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत. एकूण पाच महाविद्यालयांत १९ प्राध्यापक नियुक्त केले जाणार आहे. वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार, विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयांत प्राध्यापकांची रिक्त पदे असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी मुद्दा उपस्थित करून रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती. यासंदर्भात लोकमतने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्नही केला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी रिक्त पदांचा तिढा सोडविण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. प्राथमिक शिक्षणाधिकारी डी.एच. जुमनाके यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनात घड्याळी तासिकेवर प्राध्यापकांची तात्पुरती नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाशिम, मंगरूळपीर, कामरगाव, उंबर्डा बाजार, विठोली येथे जिल्हा परिषदेचे कनिष्ठ महाविद्यालयांना लवकरच प्राध्यापक मिळणार आहेत. भौतिकशास्त्र व जीवशास्त्र विषयाचे प्रत्येकी चार प्राध्यापक, गणित विषयाचे दोन, रसायनशास्त्र विषयाचे तीन, अर्थशास्त्र व राज्यशास्त्र विषयाचे प्रत्येकी दोन, इतिहास व इंग्रजी विषयाचे प्रत्येकी एक असे एकूण १९ प्राध्यापकांची पदे घड्याळी तासिकेनुसार भरली जाणार आहेत.