शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका

By दीपक भातुसे | Updated: November 8, 2025 06:25 IST

महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार

दीपक भातुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखा येत्या दोन आठवड्यांत जाहीर होतील, तशी तयारी सुरू असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली आहे. एक निवडणूक संपताच दुसऱ्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला तर आचारसंहितेचा कालावधी वाढू शकतो. त्याचा परिणाम विकासकामांवर होऊ शकतो, हे लक्षात घेऊन आयोगाने तयारी सुरू केलेली आहे.  

महापालिका निवडणुकाही २० जानेवारीपूर्वी उरकणार

नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केलेल्या तारखेपासून ३० दिवसांच्या आत पार पडत आहेत. तसेच, आता जिल्हा परिषदांच्या निवडणुकाही जाहीर केल्यानंतर साधारणतः ३० दिवसांच्या कालावधीत पार पाडल्या जाण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुका जाहीर होऊन डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात त्या संपवल्या जाण्याची शक्यता आहे. महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात होऊन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Zilla Parishad election dates in two weeks; election within 30 days.

Web Summary : Maharashtra State Election Commission to announce Zilla Parishad election dates soon. Elections likely within 30 days, possibly concluding by December. Municipal corporation elections expected before January 20.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक