शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कॅल्क्युलेटरपेक्षाही वेगवान गणितातील जीनिअस!, चौथीतील ऋतुराजचे दोन जागतिक विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:38 IST

चौथीतील ऋतुराज बाळासाहेब पवार याने कॅल्क्युलेटरपेक्षाही अधिक वेगवान पद्धतीने गणित सोडवत दोन जागतिक विक्रम केले आहेत. त्याला नुकतेच राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.

राम शिनगारे/मयूर देवकर औरंगाबाद : चौथीतील ऋतुराज बाळासाहेब पवार याने कॅल्क्युलेटरपेक्षाही अधिक वेगवान पद्धतीने गणित सोडवत दोन जागतिक विक्रम केले आहेत. त्याला नुकतेच राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले.येथील केम्ब्रिज शाळेतील ऋतुराजला आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘मॅथ्स जीनिअस वर्ल्ड रेकॉर्डस् अँड अवॉर्डस्’ संस्थेतर्फे, राष्ट्रीय गणित दिनानिमित्त ‘मॅथ्स जीनिअस वर्ल्ड रेकॉर्ड’ आणि ‘एक्सलन्स इन मॅथेमॅटिक्स’ पुरस्कारांनी हैदराबादमध्ये सन्मानित केले.त्याने पहिल्या विक्रमासाठी अंकांची दुप्पट करताना, १ पासून सुरुवात करून अंतिम उत्तर १४० लाख करोड म्हणजेच १५ अंकी आकड्यात दिले. हा विक्रम त्याने २ मिनिटे आणि २८ सेकंदांत पूर्ण केला.ही गणिते सोडविताना त्याने कुठलाही कागद वा पेनचा वापर केला नाही. दुसºया विक्रमात त्याने ‘मॅजिक आॅफ १०००’ हाअंक गणितातील नवीनच प्रयोग केवळ ३ मिनिटे ८ सेकंदांत सादर केला.अनेक विक्रमांसाठी नोंदणीऋतुराजच्या अफलातून बुद्धिमत्तेची एशिया बुक, लिम्का बुकने नोंद घेतली आहे.दोन्ही संस्थांचे पदाधिकारी लवकरच ऋतुराजची उलट तपासणी घेणार असल्याचे त्याचे वडील डॉ. बाळासाहेब पवार यांनी सांगितले.एका आॅनलाइन परीक्षेत त्याने २० गणिते केवळ ३० सेकंद ५९ मायक्रो सेकंदांत सोडविली.गणिती पाढे मुखोद्गतशाळेमध्ये १ ते ३० पर्यंतचे पाढे शिकविले जातात. ते केवळ १० अंकांपर्यंतच म्हटले जातात. मात्र, ऋतुराजला ७१ अंकांपर्यंतची पाढे १० पर्यंतच नव्हेत, तर १ हजार अंकांपर्यंत मुखोद्गत आहेत. डोळे बंद करून तो प्रश्न बारकाईने ऐकतो.ऋतुराजला लहानपणापासून अंकगणितामध्ये आवड आहे. त्याला शिक्षिका श्वेता दायमा आणि त्याची आई वर्षा पवार यांनी मार्गदर्शन केले आहे. त्याला आम्ही अधिक प्रोत्साहन देत आहोत.- डॉ. बाळासाहेब पवार,ऋतुराजचे वडील.