शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखळ्यांनी रंगला ‘द झेड फॅक्टर’चा सोहळा

By admin | Updated: March 5, 2017 02:17 IST

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी सुभाष चंद्रा यांच्या कंपनीने दाखल केलेली याचिका, राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात त्यांंना आलेले यश

मुंबई : कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट मिळवण्यासाठी सुभाष चंद्रा यांच्या कंपनीने दाखल केलेली याचिका, राज्यसभेचे सदस्यत्व मिळवण्यात त्यांंना आलेले यश, एस्सेल वर्ल्डवर लागू झालेल्या मनोरंजन करानंतरही सुरू असलेली यशस्वी घोडदौड; अशा यशापयशाच्या प्रवासात सुभाष चंद्रा यांना शरद पवारांसह नितीन गडकरी आणि राजकीय क्षेत्रातील मित्र कसे मिळाले? अशा काही मैत्रीपूर्वक नात्यांच्या आठवणी रंगल्या त्या राजकीय कोपरखळ्यांमुळे. निमित्त होते ते चंद्रा यांच्या ‘द झेड फॅक्टर - माय जर्नी अ‍ॅज द राँग मॅन अ‍ॅट द राइट टाइम’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्याचे.परळ येथील आयटीसी ग्रँड सेंट्रल हॉटेलमध्ये शुक्रवारी राज्यसभेचे खासदार डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आत्मचरित्राच्या मराठी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा राष्ट्रवादीचे संस्थापक-अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगला. या वेळी शरद पवार आणि नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर मारलेल्या राजकीय कोपरखळ्यांना उपस्थितांनी मनमुराद दाद दिली.शरद पवार म्हणाले, सुभाष चंद्रा यांचे हे आत्मचरित्र म्हणजे पराभव आणि विजयाची गोष्ट आहे. काही पार्श्वभूमी नसताना केलेल्या संघर्षाची ही कहाणी आहे. आव्हानांना आव्हानांनी उत्तर देणारे आणि संघर्षाला संघर्षाने उत्तर देणाऱ्या कथांनी हे पुस्तक भारावले आहे. म्हणून नव्या उद्योजकांना हे पुस्तक प्रेरणादायी आहे. नितीन गडकरी म्हणाले की, सुभाष चंद्रा हे धाडसी निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. चंद्रा यांचे आत्मचरित्र निश्चितच प्रेरणादायी असून, तरुण उद्योजकांना याचा फायदा होईल. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठी वाचकांसाठी हे आत्मचरित्र निश्चितच फायदेशीर आहे. ‘मॅनेजमेंट’चे शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल. देवेंद्र फडणवीस म्हणाले, आव्हानांना आव्हानांनीच तोंड देतात; तीच माणसे मोठी होतात. सुभाष चंद्रा यांचे हे आत्मचरित्र अशाच आव्हानात्मक कथांनी भरले आहे. चंद्रा यांनी आव्हानांना आव्हानांनीच तोंड देण्याचे काम केले आहे. युवावर्गासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. (प्रतिनिधी)...आणि सुभाषजी खासदार झालेचंद्रा हे राज्यसभेच्या खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा ते निवडून येतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होते. आम्ही त्यांना सांगितलेही होते की, तुम्ही उभे राहू नक ज्या दिवशी निवडणूक झाली त्या दिवशीच्या सायंकाळी पंतप्रधानही मला म्हणाले होते की, ‘सुभाषजी निवडून येतील की नाही, याबाबत शंका आहे...’ तेव्हा मीदेखील पंतप्रधानांना हेच म्हणालो होतो. आणि आश्चर्य म्हणजे सुभाषजी राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले, हा किस्सा नितीन गडकरी यांनी व्यासपीठावर कथन करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला शहाण्या माणसाने सरकारसोबत धंदा करू नयेसरकार कोणाचेही असो. शहाण्या माणसाने सरकारसोबत धंदा करू नये. कारण उद्योगांसंदर्भातील जटिल प्रक्रियेची नीटशी माहिती नसते. परिणामी यातच वेळ जातो आणि संबंधिताला फटका बसतो, अशी टिप्पणी नितीन गडकरी यांनी केली आणि सभागृहात एकच हशा पिकला.सुभाष चंद्रा आता राज्यसभेचे खासदार झाले आहेत आणि आता ते ज्येष्ठांच्या सभागृहात ज्येष्ठांचे प्रश्न मांडतील आणि येथे काम करतानाच ते आम्हालाही ज्येष्ठासारखे वागवतील, अशी कोपरखळी शरद पवार यांनी चंद्रा यांना आपल्या भाषणात मारली.कोणतेच सरकार अपवाद नाहीमनोरंजनाचा विषय आला म्हणजे करही आला. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रात कर माफ होतो असे नाही आणि त्याला कोणतेच सरकार अपवाद नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले.