शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST

युवकाची प्रकृती धोक्याबाहेर; प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवरील कारवाईस दिरंगाई होत असल्याने घेतले विष.

अकोला : सासर्‍याचा मृत्यू आणि पत्नीच्या गर्भपातास जबाबदार असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करवाई करण्याच्या मागणीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात युवकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. युवकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतोष शेषराव भगत याचे सासरे प्रकाश अढाऊ हे २ एप्रिल रोजी अपघातात जखमी झाले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने, डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी भगत यांच्या नातेवाइकांसोबत वाद घालून ४0 ते ५0 प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद वाढून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी भगत यांची गर्भवती पत्नी कल्पना भगत हिला व नातेवाइकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, भगत यांचे सासरे प्रकाश अढाऊ यांचा मृत्यू झाला. पत्नीला मारहाण झाल्याने तिचाही गर्भपात करावा लागला. दुसरीकडे पोलिसांनी मात्र संतोष भगत व त्यांच्या नातेवाइकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल केले; परंतु त्यांना अटक केली नाही. सासर्‍याच्या मृत्यूस आणि पत्नीच्या गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भगत यांनी केली होती. त्यानंतर भगत यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तक्रारी केल्या. परंतु कारवाई होत नसल्याने अखेर संतोष भगत यांनी पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथे उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते व भगत यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले.

* निष्पक्ष चौकशी करु - रणजित पाटील

        प्रशिक्षणार्थी डॉक्टर व संतोष भगत यांच्या कुटुंबियांमध्ये भांडण झाले होते. भगत यांनी पोलीस अधीक्षक व मला निवेदन दिले होते. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पोलिसांना दिले होते. याप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हेही दाखल केले होते; मात्र भगत यांची मागणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी होती. देशात कायदा आहे, त्यानुसार कारवाई होत असते. शुक्रवारी या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याची लवकरच भेट घेऊ. चौकशी करून त्याला न्याय देऊ, असे रणजित पाटील यांनी सांगितले.