शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: July 11, 2015 02:04 IST

सासऱ्याचा मृत्यू आणि पत्नीच्या गर्भपातास जबाबदार असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करवाई करण्याच्या मागणीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील

अकोला : सासऱ्याचा मृत्यू आणि पत्नीच्या गर्भपातास जबाबदार असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर करवाई करण्याच्या मागणीसाठी गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या संपर्क कार्यालयात युवकाने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. युवकावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संतोष भगत याचे सासरे प्रकाश अढाऊ हे २ एप्रिल रोजी अपघातात जखमी झाले. त्यांना सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्टरांनी उपचारास विलंब केल्याने, डॉक्टरांना जाब विचारला असता त्यांनी भगत यांच्या नातेवाईकांसोबत वाद घालून ४० ते ५० प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना बोलावून घेतले. नातेवाईक व डॉक्टरांमध्ये वाद वाढून प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी भगत यांची गर्भवती पत्नी कल्पना भगत हिला व नातेवाईकांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. दरम्यान, भगत यांचे सासरे प्रकाश अढाऊ यांचा मृत्यू झाला. पत्नीला मारहाण झाल्याने तिचाही गर्भपात करावा लागला. दुसरीकडे पोलिसांनी मात्र संतोष भगत व त्यांच्या नातेवाइकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर मालमत्ता नुकसान कायद्यानुसार गुन्हे दाखल केले; परंतु त्यांना अटक केली नाही. सासऱ्याच्या मृत्यूस आणि पत्नीच्या गर्भपातास कारणीभूत ठरलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संतोष भगत यांनी केली होती. त्यानंतर भगत यांनी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे तक्रारी केल्या़ परंतु कारवाई होत नसल्याने अखेर संतोष भगत यांनी पालकमंत्री पाटील यांच्या संपर्क कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब तेथे उपस्थित असलेले भाजपा कार्यकर्ते व भगत यांच्या नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने त्याला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)