शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘स्टेटस’ गेल्याने तरुणाई नाराज

By admin | Updated: March 7, 2017 01:03 IST

व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टेटस हरविल्याने तरुणाई नाराज झाली आहे.

बेनझीर जमादार,पुणे- व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या व्हर्जनमध्ये स्टेटस हरविल्याने तरुणाई नाराज झाली आहे. या नव्या व्हर्जनवर प्रोफाईल म्हणून फक्त फोटोच अपलोड करता येऊ शकतो; मात्र स्टेटस अपडेट होत नाही. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस म्हणजे एखादी भावना आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. कोणाला वाढदिवस, परीक्षा, सणसूद अशा अनेक आनंदाच्या क्षणाच्या शुभेच्छादेखील या माध्यमातूनच दिल्या जातात. मित्रासोबत भांडणे झाली, कोणी मन दुखावले असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीला टोमणे मारण्याची जागादेखील व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसची होते. त्याचबरोबर आज कोणाचा काय मूड आहे, याचे आकलनदेखील स्टेटसच्या माध्यमातून व्हायचे. कोण कुठे फेरफटका मारत आहे, हेसुद्धा या स्टेटसमधून कळत होते. आता मात्र या सर्व गोष्टींना तरुणाईला मुकावे लागणार आहे.सोशल मीडियावरही या व्हर्जनवर टीका होत आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून मजेशीर कमेंट, पोस्ट आणि जोक्स पाहायला मिळत आहेत. स्टेटसला भावपूर्ण श्रद्धांजलीे, बाकी कुणाचा विचार नाही केला तरी चाललं असतं; पण पुणेकरांचा विचार केला पाहिजे, असे म्हणत पुणेकरांना पुन्हा टार्गेट केले आहे. >व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन हा एक नंबर बकवास आहे. आता कोणाचे स्टेटसही वाचता येणार नाही. स्टेटस वाचणे हा एक चांगला टाइमपास होता. एकदा फोटो अपलोड केला, तर फक्त २४ तासच अपडेट राहतो. त्यानंतर तो डिलीट होतो. आता कोणाचा फोटो पाहण्यासाठी काय २४ तास फोन हातात ठेवायचा का? भले ते अपडेट जरी मिळत असेल तरी. - कृणाल मेहता, तरुणव्हॉट्सअ‍ॅपचे नवीन व्हर्जन मला बिलकूल पटलेच नाही, कारण पूर्वी व्हॉट्सअ‍ॅप हाताळणे सोपे होते. आता खूपच अवघड करून टाकले आहे. स्टेटसही ठेवता येत नाही की कोणाचे वाचताही येत नाही. आता ते नवीन व्हर्जन डिलीटही मारता येत नाही. म्हणूनच आवर्जून सांगावेसे वाटते, की जे जुने व्हॉट्सअ‍ॅप वापरत असेल, त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप अपडेट करू नका. नाही तर फक्त हाती लागेल पछतावा. - प्राची विधाते, तरुणी