शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

तरुणाची निर्घृण हत्या

By admin | Updated: May 13, 2015 02:03 IST

कांदिवली पूर्वच्या पोईसर परिसरात एका २४वर्षीय तरुणाची हत्या सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. बहिणीच्या छेडछाडीतून झालेल्या

मुंबई : कांदिवली पूर्वच्या पोईसर परिसरात एका २४वर्षीय तरुणाची हत्या सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली. बहिणीच्या छेडछाडीतून झालेल्या वादात या तरुणाला जीव गमवावा लागल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र त्याच्या मारेकऱ्यांना अवघ्या काही तासांतच जेरबंद करण्यात समतानगर पोलिसांना यश आले आहे.अनिस सय्यद असे मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या शेजारीच उदय मंडल (२२) आणि विकास मंडल (२८) हे दोघे भाऊ राहतात. अनिसचा जावेद नावाचा एक मित्र आहे. जावेद हा मंडळ यांच्या बहिणीची छेडछाड करत असल्याचा त्यांचा आरोप होता. त्यामुळे काही दिवसांपूर्वी जावेदची समजूत काढण्यासाठी उदयने त्याला बोलावले. त्या वेळी सोबत असलेल्या अनिसने उदयला धक्काबुक्की केली. त्याचा राग त्याच्या मनात होता. समतानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, उदय आणि विकास यांनी अनिसला सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास पोइसर परिसरात अडवले. या ठिकाणी त्यांची बाचाबाची झाली. तेव्हा त्यांनी रस्त्यावरील एक पेव्हर ब्लॉक उचलून तो अनिसच्या डोक्यात घातला. त्याला जखमी अवस्थेत सोडून त्यांनी घटनास्थळाहून पळ काढला. स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवून नंतर अनिसला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)