- डिप्पी वांकाणी, मुंबईमोहसीन सय्यदच्या सांगण्यावरून मालवणीहून पुण्यात गेलेल्या, त्या आॅटोरिक्षाचालकाची चौकशी आता मुंबई पोलीस करत आहेत. परंतु, मोहसीनसोबत पुढे न जाता हा रिक्षाचालक परत आला होता. पोलिसांनी त्या रिक्षाचा नोंदणी क्रमांक मिळविला आहे. याबाबत अधिक तपास सध्या सुरू आहे. राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाकडून वाजिद शेख आणि नूर मोहम्मद यांची चौकशी सुरू आहे. १५ डिसेंबर रोजी हे दोघे घरातून गायब झाले होते. पण, त्यांचे नाव इसिसशी जोडले गेल्यानंतर ते परतले होते. त्यांच्यापैकीच एक असलेला आॅटोरिक्षाचालक मोहसीन सय्यद मात्र अद्याप परतलेला नाही. याच भागातून आणखी कोणी गायब असल्याची काही तक्रार आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांच्या गुप्तचर शाखेने केला, पण या भागातून अन्य कोणतीही तक्रार नसल्याचे समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अन्वर (नाव बदललेले) हा मोहसीनचा मित्र आहे. अन्वर आॅटोरिक्षाचालक असून तो ड्रगच्या आहारी गेलेला आहे. त्याने चौकशीत सांगितले की, तो पुण्यापर्यंत गेला होता. पण मोहसीनसोबत त्याचे कोणतेही कटकारस्थान नव्हते. आपण पुण्याहून परत येण्याचे ठरविल्याचे सांगतानाच मोहसीनसोबतचा संपर्क नंतर तुटल्याचेही तो म्हणाला. वाजिद शेख व नूर मोहम्मद यांनी पोलिसांना सांगितले की, अयाज सुलतान हा आॅक्टोबरपासून बेपत्ता असल्यामुळे अयाजचे कुटुंबीय याबाबत आम्हा दोघांनाचा जबाबदार ठरवीत होते. आमच्यावर आरोप करत होते. त्यामुळे लपून राहण्यासाठी मोहसीननेच आम्हाला उचकविले होते.
‘त्या’ तरुणांची कसून चौकशी
By admin | Updated: December 31, 2015 00:21 IST