शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वेळेत अर्ज न करू शकलेल्या तरुणास मिळाली परीक्षेची संधी

By admin | Updated: June 20, 2017 02:39 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) वेबसाइट ऐनवेळी हँग झाल्याने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया

विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) वेबसाइट ऐनवेळी हँग झाल्याने आॅनलाइन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया ठरलेल्या मुदतीत पूर्ण न करू शकलेल्या मराठवाड्यातील एका तरुणाला रविवारी झालेली नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा देण्याची संधी उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे मिळाली.औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील बिडकिन येथील गणेश नगरात राहणाऱ्या या सुदैवी तरुणाचे नाव संदीप अंबादास काळे असे आहे. आॅनलाइन अर्ज वेळेत दाखल न झाल्याचे कारण देऊन ‘यूपीएससी’ने संदीपला या परीक्षेस प्रवेश नाकारला होता. याविरुद्ध त्याने केलेली याचिका औरंगाबाद येथील न्या. अनूप मोहता व न्या. सुनिल कोतवाल यांच्या खंडपीठाने मंजूर केली व संदीपला लगेच ई- हॉल तिकिट जारी करावे, असा आदेश दिला.वेबसाइट हँग झाल्याने संदीप स्कॅन केलेली त्याची स्वाक्षरी व छायाचित्र अपलोड करू शकला नव्हता. यूपीएससीने त्याची स्वाक्षरी व छायाचित्र परीक्षा केंद्रावर स्वीकारण्याची व्यवस्था करावी व त्याला औरंगाबाद केंद्रात परिक्षेला बसू द्यावे, असाही आदेश न्यायालयाने दिला. न्यायालयाच्या या आदेशामुळे रविवारी १८ जून रोजी झालेली ही परीक्षा देण्याची, त्याची कोणतीही चूक नसूनही हुकलेली संधी मिळाली.या परीक्षेसाठी आॅनलाइन भरण्याची मुदत १७ मार्च रोजी सा. ६ वाजेपर्यंत होती. संदीपने या शेवटच्या दिवशी मुदत संपण्याच्या तासभर आधी आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली. बाकी सर्व माहिती भरून झाली, परीक्षा शुल्क आॅनलाइन भरून झाले आणि सा. ५.१२ च्या सुमारास फक्त स्कॅन केलेली स्वाक्षरी व छायाचित्र अपलोड करण्याचे शिल्लक असताना युपीएससीची साइट हँग झाली. सा. ६ ची अंतिम मुदत टळून गेली तरी वेबसाइटमधील तांत्रिक बिघाड दूर झाला नाही आणि संदीपचे अर्ज दाखल करणे अर्धवट राहिले. संदीपने त्या दिवशी सा. ६.२४ व पुन्हा रात्री १०.४३ वाजता युपीएससीच्या अध्यक्षांना तातडीने ई-मेल करून ही अडचण निदर्शनास आणली. परंतु युपीएससीने त्याची कोणतीही दखल न घेता संदीपने वेळेत अर्ज केला नाही, असे ठरवून त्यास परीक्षेला बसू दिले नाही.न्यायालयाने म्हटले की, एरवी आम्ही अशी ऐनवेळी केलेली याचिका ऐकलीही नसती. परंतु अशी अडचण इतरही अनेकांना आली असेल व अशा वेळी उमेदवार काहीच करू शकत नाही. त्यामुळे परिक्षेची संधी हुकून करीयर वाया जाऊ नये यासाठी आम्ही हा आदेश देत आहोत. या सुनावणीत अर्जदारासाठी अ‍ॅड. जीवन जे. पाटील यांनी तर केंद्र सरकार व युपीएससीतर्फे अ‍ॅड. दिपाली जपे यांनी काम पाहिले.यूपीएससीचा बचाव अमान्ययूपीएससीने इतर मुद्द्यांखेरीज असाही बचाव घेतला की, उमेदवाराने अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या तासापर्यंत न थांबता आधी अर्ज भरला असता तर ही वेळ आली नसती. परंतु न्यायालयाने म्हटले की, आदर्श स्थितीमध्ये हे म्हणणे बरोबर असले तरी मुदतीच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्ज भरता येऊ शकतो हेही नाकारता येणार नाही. याशिवाय त्यादिवशी वेबसाईट हँग झाल्याचा मोघमपणे केलेला इन्कार व उमेदवाराने लगेच केलेल्या ई-मेलची दखल न घेणे यावरूनही खंडपीठाने युपीएससीच्या प्रतिकूल भाष्य केले.