शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधीक्षक कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: June 11, 2016 02:50 IST

अकोला येथील घटना; ठाणेदाराने दखल न घेतल्याने घेतले विष.

अकोला: पोलीस अधीक्षक कार्यालयात सोबत आणलेले विष प्राशन करुन युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ११.४0 वाजता घडली. हा प्रकार पोलीस कर्मचार्‍यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने युवकाला सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. डाबकी रोड ठाणेदारांनी एका प्रकरणामध्ये आरोपींवर कारवाई न केल्यामुळे व्यथित होऊन या युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सदानंद सारंगधर धानोरकार(३५) याच्या पत्नी व मुलांना परिसरातील काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी मारहाण केली आणि विनयभंग केला. याप्रकरणी त्याच्या पत्नीने डाबकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. यानंतर आरोपींची जामिनावर सुटका झाली. आरोपी सदानंद धानोरकार व त्याच्या कुटुंबाला त्रास देऊ लागले. याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात करून आरोपींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती. त्याच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, उलट ठाणेदाराने त्याला शिवीगाळ केली. यामुळे सदानंद व्यथित झाला होता. शुक्रवारी तो पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यासाठी आला. यावेळी त्याने सोबत कीटकनाशकाची बॉटलसुद्धा सोबत आणली होती. सदानंद धानोरकार याने पोलीस अधीक्षक कार्यालयातच विषारी द्रव्य प्राशन केले. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांकडून सांगितले जात आहे. मुख्यालयातील पोलीस कर्मचारी आळुराम पवार यांच्या तक्रारीवरून सदानंदविरुद्ध भादंविच्या कलम ३0९ अन्वये गुन्हा दाखल केला.