शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी व्यसनांबाबत सतर्क राहावे

By admin | Updated: June 30, 2016 02:43 IST

नेरुळ डी. वाय. पाटील रुग्णालयात व्यसनमुक्तीवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

नवी मुंबई : अमली पदार्थ सेवन विरोधी दिवसानिमित्त सोमवारी नेरुळ डी. वाय. पाटील रुग्णालयात व्यसनमुक्तीवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि वाशीतील अन्वय व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तरुणांना व्यसनांचे दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्तीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला.तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील तरुण पिढीने व्यसनांबाबतीत सावध असणे अतिशय गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नगराळे यांनी मांडली. अमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणामांची माहिती या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. पालक, शिक्षक, समुपदेशक, पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परिवर्तन करता येऊ शकते, असेही नगराळे यांनी सांगितले. मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. क्रांती कदम यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून व्यसनांविषयीची अभ्यासपूर्ण मांडणी केली. अन्वय व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. अजित मगदूम यांनी पंजाब, मणिपूर, मिझोराम, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातील तसेच मुंबई, हैदराबाद यासारख्या शहरातील व्यसनांचे वास्तव विषद केले. यावेळी आदर्श नय्यर, सतीश मोरे, समाजसेविका वृषाली मगदूम, अनिल लाड, ज्ञानेश भेगले, सुषमा बिडवे, डी. वाय. पाटील रुग्णालयाचे डॉ. शिरीष पाटील, डॉ. श्याम मोरे आणि मेडिकलचे विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)