शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांकडून तरुणांना मारहाण

By admin | Updated: May 9, 2014 22:30 IST

वाडा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे.

एक अटकेत : वाडयात अवैध रेती व्यावसायिकांचे पेववाडा- वाडा तालुक्यात अवैध रेती उपसा व वाहतूक राजरोसपणे सुरू आहे. वाहतूक करणार्‍या टोळक्यांचा सुळसुळाट झाला असूनगुरूवारी (दि. ८) रात्री रस्त्यावरून प्रवास करणार्‍या तरुणांच्या अंगावर भरधाव वाहन घातल्याचा जाब विचारण्यासाठी गेल्यावर या तरुणांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी एकास अटक केली असून त्याच्या साथीदार फरार आहे़वाडा तालुक्यातील शिळफाटा या ठिकाणी विक्रांत पाटील हा तरुण आपल्या मित्रासह पिळ गावाच्या दिशेने जात असताना मलवाडा नदीवरून रेतीची अवैध वाहतूक करणारा भरधाव ट्रक तरुणांच्या अंगावर घातला गेला. यात थोडक्यात बचाल्यानंतर याचा जाब विचारण्यासाठी तो गेला असता ट्रकच्या सोबत असणारा दर्शन भोईर, चालक इकबाल शेख व अन्य तीन साथिदारांनी विक्रांत पाटील व त्याचा मित्र महेंद्र पाटील यांना बेदम मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या बाबत सदर तरुणांनी वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता वाडा पोलिसांनी दर्शन भोईर याला अटक केली असून अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. रेतीचा अवैध वाहतूक करणारा ट्रकही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.वाळू उपशावर कायद्याने बंदी असतानाही वाडा तालुक्यातील पिंजाळ, वैतरणा, तानसा या नद्यांवर राजरोसपणे रेतीचा उपसा सुरू असतो. रेतीची वाहतूक रात्री खुलेआमपणे केली जात असताना महसूल विभाग मात्र धिम्म आहे. महसूल विभागाशी अर्थपूर्ण व्यवहार होत असल्याने ते कारवाई करीत नाहीत, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान रेतीची वाहतूक करणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी वरील तरुणांनी केली आहे. (वार्ताहर)