शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव
2
Video: फिल्मी स्टाईल पाठलाग करून ७ जणांनी एकाची केली हत्या; CCTV पाहून अंगावर काटा येईल
3
तो हल्ला रशियाला वाटाघाटी करण्यास भाग पाडेल; शांतता बैठकीच्या एक दिवस आधी हल्ला का केला? झेलेन्स्कींनी सांगितले...  
4
अमेरिका-चीनदरम्यान थांबणार का ट्रेड? अर्धी झाली मालवाहू जहाजांची संख्या, कारण काय?
5
सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला "वॉरहेड" हल्ल्याची धमकी
6
"आपण तुझ्या लग्नात हुंडा मागू, आयुष्यभर पुरतील इतके..." असं का म्हणालेले संकर्षणचे वडील? अभिनेत्याची पोस्ट
7
Asia Cup 2025: एमर्जिंग महिला आशिया चषक स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित, कारण काय?
8
धक्कादायक! प्रेमविवाहानंतर वडिलांसोबत मिळून पतीची हत्या; कारण जाणून धक्का बसेल
9
चहावाल्याचा मुलगा MBA झाला, परदेशात नोकरीची ऑफर; १५ लाखांचे पॅकेज, वडील झाले भावुक
10
रणजित कासले याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाबाहेर सरकारविरोधात दिल्या घोषणा
11
Astrology: ३ जून रोजी पाच राशींवर होणार मारुतीरायाची कृपा; पैशात होईल दुप्पट वाढ!
12
लश्कर-ए-तोयबा आणि जैश ए मोहम्मदचा भारताविरोधात नवा कट उघड; पाकिस्तान करतंय फंडिंग
13
थरकाप उडवणारी घटना...! ५७ वर्षीय महिलेचे घरमालकाशीच सुरू होते प्रेम प्रकरण, मालमत्ता हडपण्यासाठी जिवंत जाळलं!
14
'मोठ्या घरची राणी, मात्र बदनाम केलं हगवणेंनी..."; फॉर्च्युनर गाडीवरील मजकुराची सोशल मीडियावर चर्चा
15
एक्सने कात टाकली! नवे मॅसेंजिंग फीचर XChat लाँच केले; ऑडिओ, व्हिडिओ कॉलही होणार...
16
Coronavirus: ठाण्यात ४३ वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, महाराष्ट्रातील मृतांचा आकडा ८ वर
17
क्रिकेट विश्वात एकाच दिवशी दोन धक्के! मॅक्सवेलनंतर आणखी एका स्टार खेळाडूचा क्रिकेटला रामराम
18
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीसमोर नवं आव्हान; सर्वात मोठ्या शत्रू देशाने भारताला दिली ऑफर
19
S-400 सोबत 'हे' भारतीय शस्त्र असतं, तर फेल झाला असता युक्रेनचा प्रत्येक हल्ला; ऑपरेशन सिंदूरवेळी संपूर्ण जगानं बघितलीय कमाल!
20
Virat Kohli: विराट कोहलीची दहावीची मार्कशीट व्हायरल, त्याला किती मार्क्स मिळाले? पाहा

पोलिसांच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या?

By admin | Updated: November 1, 2015 00:25 IST

तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली (जि. पुणे) येथील काळे ओढा परिसरात शनिवारी सकाळी घडली. अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) असे त्याचे

वाघोली : तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना वाघोली (जि. पुणे) येथील काळे ओढा परिसरात शनिवारी सकाळी घडली. अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) असे त्याचे नाव आहे. पोलिसांच्या जाचाला कंटाळून हे पाउल उचलल्याचे त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी तरुणाने लिहिलेल्या चिठ्ठीत पोलिसांनी दिलेल्या त्रासाचा उल्लेख केला असून, आत्महत्येला पोलीस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणाची अतिरिक्त पोलीस अधीक्षक तानाजीराव चिखले यांच्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. महिन्यापूर्वी एका महिलेने अतुल रामदास कुसमुडे (२३, रा. वाघोली) व इतर दोघांवर विनयभंगाची फिर्याद दिली होती. या गुन्ह्यात अटकेनंतर न्यायालयात हजर केल्यानंतर अतुल १५ दिवस येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता़ काही दिवसांपूर्वी तो जामिनावर सुटला होता़ त्यानंतर तो चुलत्यांकडे गेला होता़ दोनच दिवसांपूर्वी तो घरी आला होता़ शनिवारी सकाळी त्याचे आई, वडील बाहेर गेले होते़ घरात आजी होती़ त्याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांमार्फत आत्महत्येची चौकशी करण्याचे आदेश ग्रामीणचे अधीक्षक डॉ. जय जाधव यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)चिठ्ठीत पोलिसांचा उल्लेखसहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे व पोलीस कर्मचारी गणेश पोटे यांनी त्रास दिल्याचा चिठ्ठीत उल्लेख आहे. अतुलच्या आत्महत्येला पोलीस जबाबदार असून, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अतुलच्या वडिलांनी केली आहे.अतुलवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न करण्याचा, तसेच विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. त्याचे कुटुंबाबरोबरही वाद होते. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस त्याला बोलवत होते. पोलिसांकडून उपरोक्त प्रकार घडलेला नाही. - वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक