शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याच सवयी मेंदूला घातक

By admin | Updated: November 11, 2014 00:59 IST

तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व शोधांचे सगळे

नागपूर : तसे पाहिले तर मेंदूचे महत्त्व शरीरात सर्वात जास्त आहे. जन्मापासून ते आयुष्याच्या अंतापर्यंत मेंदूचे काम निरंतर सुरू राहते व जगण्याला खरी दिशा त्याच्यामुळेच मिळते. जगातील सर्व शोधांचे सगळे श्रेय मेंदूलाच जाते. मात्र आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण मेंदूला जपताना कुठेतरी मागे पडताना दिसून येतो. हृदय, किडनी, डोळे इतकेच काय पण नखांना देखील त्रास होऊ नये म्हणून आपण काळजी घेतो.मात्र खरेच कितीजण आपला मेंदूदेखील निरोगी रहावा यासाठी प्रयत्न करतात? न्यूरोसर्जन्सचे तर हे मत आहे की प्रत्येकाला आपल्या मेंदूला कशामुळे त्रास होऊ शकतो व त्यापासून रक्षण करण्यासाठी काय केले पाहिजे याची माहिती पाहिजे. विशेष म्हणजे आपल्या सवयी कधीकधी मेंदूच्या समस्येला आमंत्रण देत असतात. मेंदूला नुकसानकारक असणाऱ्या आपल्या सवयी.(प्रतिनिधी)नाश्ता टाळणे : अनेकजणांची ही धारणा असते की सकाळी नाश्ता केल्याने पोटातील भूक कमी होते व त्याचा परिणाम जेवणावर होतो. मात्र आदल्या दिवशी रात्रीचे जेवण झाल्यापासून पोटात काहीही नसते. त्यामुळे ब्लडशुगरची पातळी खालावण्याचा धोका असतो. जर पातळी खाली गेली तर मेंदूला हवे असलेले घटक मिळत नाही आणि त्यामुळे मेंदूचे विकार होऊ शकतात.अतिप्रमाणात खाणे : कुठलीही गोष्ट अतिप्रमाणात खाणे हे चुकीचेच आहे. यामुळे मेंदूच्या रक्तवाहिन्यांवर प्रतिकूल परिणाम होऊन विचारशक्तीची क्षमता कमी होऊ शकते.धूम्रपान : धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचित पावतात आणि यामुळे अल्झेमर हा आजार होऊ शकतो.जास्त गोड खाणे : अतिप्रमाणात साखरेचे सेवन केल्याने प्रथिने आणि पोषक द्रव्ये पूर्णपणे शोषल्या जात नाहीत व त्यामुळे कुपोषणाची शक्यता निर्माण होते. जर असे झाले तर मेंदूच्या विकास थांबतो.हवेचे प्रदूषण : आपल्या शरीरात सर्वात जास्त प्राणवायू हा मेंदूला लागतो. जर सातत्याने प्रदूषणयुक्त हवेत श्वसन झाले तर मेंदूला योग्य प्रमाणात प्राणवायुचा पुरवठा होत नाही. मेंदूची कार्यक्षमता यामुळे कमी होते.निद्रानाश : ज्यावेळी एखादी व्यक्ती झोपली असते तेव्हा मेंदूलादेखील आराम मिळतो. मात्र जर निद्रानाशाचा विकार जडला असेल किंवा बरेच दिवस कमी झोप घेतली तर मेंदूच्या पेशी नष्ट होतात.डोक्यावरून चादर घेणे : रात्री झोपताना जर डोक्यावरून जाड चादर घेतली तर प्राणवायुचा पुरवठा सुरळीतपणे होत नाही आणि कार्बन डाय आॅक्साईडचे प्रमाण वाढते . यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. जास्त विचार करणे : जर एखाद्या व्यक्तीची तब्येत खराब असेल आणि त्यादरम्यान जास्त प्रमाणात वैचारिक काम झाले किंवा अति अभ्यास केला तर मेंदूच्या नसांवर ताण येऊ शकतो.