शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

युवा पिढी ‘शॉर्ट फिल्म्स’कडे वळतेय!

By admin | Updated: July 4, 2016 02:42 IST

नाटक, एकांकिका आणि सिनेमासोबतच हल्ली युवा पिढीला शॉर्ट फिल्म अर्थात लघुपटाचे वेड लागले आहे.

जयेश पवार,

मुंबई- नाटक, एकांकिका आणि सिनेमासोबतच हल्ली युवा पिढीला शॉर्ट फिल्म अर्थात लघुपटाचे वेड लागले आहे. अगदी काहीच मिनिटांच्या व्हिडीओमधून मोठा सामाजिक संदेश देणारे लघुपट पाहण्यासोबतच ते तयार करायलादेखील तरुणांना आवडते. लघुपटप्रेमींना चालना मिळावी यासाठी मुंबई विद्यापीठात ‘५व्या मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.सम्यक कलांश आणि १०७.८ मस्ट रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठात ‘५वा मस्ट आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. ११ ते १३ जुलै या कालावधीत मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात सकाळी १० ते सायं. ५ या वेळेत हा महोत्सव होणार असून, या वेळी वेगवेगळ्या देशांतील सामाजिक विषयांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ४८ लघुपटांचे सादरीकरण होणार आहे. विशेष म्हणजे महोत्सवादरम्यान लघुपट निर्माता व प्रेक्षक यांच्यात परिसंवाद साधला जाणार आहे. या लघुपट महोत्सवासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नसून लघुपटात करिअर करू पाहणाऱ्या तरुणाईला लघुपटांविषयीचे मार्गदर्शनही या वेळी उपस्थित दिग्दर्शक, निर्मात्यांकडून मिळू शकेल. लघुपट महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे. लघुपटप्रेमींसाठी हक्काचे व्यासपीठ असून, याचा अधिकाधिक फायदा तरुणांनी घ्यावा. लघुपटाविषयी असणाऱ्या तुमच्या अनेक शंकांचे निरसन महोत्सवादरम्यान येणाऱ्या मान्यवरांकडून होईलच.- शशांक बमनोलकर, अध्यक्ष, सम्यक कलांश