शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो, एका हाताने संगणक तर दुसऱ्या हाताने बंदूक चालवा!

By admin | Updated: April 27, 2015 03:44 IST

चीनचा जगावर वाढत असलेला प्रभाव तसेच पाकिस्तानला केली जात असलेली भरीव आर्थिक मदत यामुळे आपण धास्तावलो असल्याचे सांगत ज्येष्ठ

पुणे : चीनचा जगावर वाढत असलेला प्रभाव तसेच पाकिस्तानला केली जात असलेली भरीव आर्थिक मदत यामुळे आपण धास्तावलो असल्याचे सांगत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी लष्करी प्रशिक्षण देणारी महाविद्यालये निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली. तरूणांनी एका हाताने संगणक चालविण्याचे ज्ञान मिळविण्याबरोबर दुसऱ्या हाताने बंदुक चालवायला शिकले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी भारती विद्यापीठाच्या विसाव्या स्थापना दिन समारंभात तरूण पिढीला दिला.गोखले यांच्यासह ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, युवक क्रांती दलाचे प्रमुख डॉ. कुमार सप्तर्षी व विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. उत्तम भोईटे यांना जीवनसाधना गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. सध्या बुद्धांक महत्त्वाचा वाटत असला तरी भावनांक सुद्धा महत्त्वाचा आहे, असे सांगून गोखले म्हणाले, मी वेगळ््याच विचाराने धास्तावलो आहे. तरुणांना फक्त संगणकाचे ज्ञान नको. त्यांनी एका हाताने बंदुक चालवावी. आपण महात्माजींच्या देशात राहत असलो तरी आक्रमणाशिवाय काही करू शकणार नाही. शिक्षण संस्थांमधून इंजिनिअर, डॉक्टर व्हावेत पण उत्तम माणूस म्हणूनही तरूणांनी बाहेर पडायला हवे. सध्या शिक्षणाला वेगळे परिमाण प्राप्त झाले आहे. ते समजून घ्यायला हवे. जात, धर्म न पाहता समोरच्या व्यक्तीचा आदर करायला शिकले पाहिजे, असे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी नमुद केले. भारतीय नागरीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून द्यायला हवे. त्यासाठी शिक्षणातच त्याचा समावेश करायला हवा. कारण भारताला महासत्ता होण्यासाठी तरूणांचे योगदान महत्वाचे ठरणार आहे, असे मत डॉ. भटकर यांनी व्यक्त केले.माणसामाणसांतील अंतर कमी करणे, जात-पात न मानणे हे शिक्षणाचे ब्रीद असले पाहिजे. समताधिष्ठित समाजरचना निर्माण झाली पाहिजे, असे डॉ. सप्तर्षी म्हणाले. अनेक शिक्षणसंस्थांवर एखाद्या जाती-धर्माचे नियंत्रण असल्याचे दिसते. ठराविक धर्माचा पगडा दिसतो. भारती विद्यापीठाने मात्र राष्ट्रीय एकात्मता जोपासत शिक्षणातून समाजपरिवर्तन घडविले आहे, असे भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)