शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भररस्त्यात तरुणीला भोसकले

By admin | Updated: May 25, 2016 02:40 IST

कामावर जात असताना भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. करिश्मा माने (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी

मुंबई : कामावर जात असताना भररस्त्यात तरुणीवर चाकूने हल्ला करत तिची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी चेंबूर येथे घडली. करिश्मा माने (२४) असे या तरुणीचे नाव असून, या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला आहे.चेंबूरच्या सुमननगर परिसरात ही तरुणी आई-वडील आणि दोन भावंडांसह राहत होती. दादर येथील एका कपड्याच्या दुकानामध्ये ती नोकरी करत होती. मंगळवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली. सुमननगर येथून कुर्ला रेल्वे स्थानकात जाण्यासाठी थेट रिक्षा मिळत नसल्याने ती कुर्ल्याच्या शिवसृष्टी सोसायटी परिसरातून शेअर रिक्षा पकडत असे. मंगळवारीही नेहमीप्रमाणे ती याच परिसरातून कामावरून जाण्यासाठी निघाली. मात्र याच परिसरात दबा धरून बसलेल्या आरोपीने पाठीमागून तिच्यावर चाकूहल्ला केला. हल्लेखोराने पाठीत चाकू खुपसून कुर्ल्याच्या दिशेने पळ काढला.याच परिसरातून जाणाऱ्या काही पादचाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तिला रिक्षात घालून येथील सुराणा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तत्काळ तिच्यावर उपचार सुरू करत शस्त्रक्रियेची तयारी केली. मात्र शस्त्रक्रिया सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच रुग्णालय परिसरात रहिवाशांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. (प्रतिनिधी)बराच वेळ चाकू पाठीतचहल्लेखोराने या तरुणीच्या पाठीत चाकू खुपसून पळ काढला. त्यामुळे बराच वेळ हा चाकू तरुणीच्या पाठीतच होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा चाकू काढण्यासाठी ती डॉक्टरांकडे विनंती करत होती. त्यामुळे डॉक्टरांनी तिची ही गंभीर अवस्था पाहून तिच्यावर तत्काळ उपचार सुरू केले.ज्या ठिकाणी या तरुणीची हत्या झाली; त्याच ठिकाणी अनेकदा पादचाऱ्यांना लुटल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे ही हत्यादेखील लुटीच्या माध्यमातून झाली असावी असा संशय पोलिसांना होता. मात्र तरुणीच्या अंगावरील एकही दागिना गायब झाला नव्हता. शिवाय तिची पर्स आणि मोबाइलदेखील तिच्याजवळच होता. त्यामुळे ही हत्या पे्रमप्रकरणातून झाली असावी, असा अंदाज पोलिसांना आहे. त्यानुसार नेहरू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.