शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

यंग प्रभादेवीची आगेकूच!

By admin | Updated: April 20, 2016 05:29 IST

यंग प्रभादेवी आणि एचजीएस या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रथमश्रेणी ‘अ’ गटात विजयी कूच कायम राखली.

मुंबई : यंग प्रभादेवी आणि एचजीएस या संघांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारताना आमदार चषक कबड्डी स्पर्धेच्या प्रथमश्रेणी ‘अ’ गटात विजयी कूच कायम राखली. दुसरीकडे ‘ब’ गटात प्रॉमिस स्पोटर््स क्लबने नवमित्र क्रीडा मंडळाला नमवले, तर प्रभादेवीच्या विकास संघाचे आव्हान संपुष्टात आले.मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि विजय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दादर येथील दत्ता राऊळ मैदानात सुरू असलेल्या या स्पर्धेत अतुल गावकरच्या आक्रमक चढाया आणि प्रमोद नेसरकर, विशाल चिंदरकर यांच्या दमदार पकडीच्या जोरावर यंग प्रभादेवी संघाने ओम श्री साईनाथ सेवा ट्रस्टचा ३०-९ असा सहज फडशा पाडला.यानंतर झालेल्या अटीतटीच्या लढतीत एचजीएस क्रीडा मंडळाने सुनील स्पोटर््स क्लबचे आव्हान ३८-३५ असे परतावून आगेकूच केली. मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना एचजीएसने निर्णायक गुणांची कमाई करताना बाजी मारली. ओंकार जाधव, प्रमोद पवार आणि चंदन सिंग यांनी उत्कृष्ट खेळ करताना एचजीएसच्या विजयात मोलाचे योगदान दिले. तर रोहन जाधव, सागर गुप्ता व चेतन गावकर यांनी पराभूत संघाकडून अपयशी झुंज दिली. स्पर्धेच्या ‘ब’ गटात दादरच्या प्रॉमिस संघाने विजयी घोडदौड कायम राखताना नवमित्र क्रीडा मंडळाचा ३३-१२ असा पाडाव केला. मध्यंतरालाच प्रॉमिस संघाने १३-४ अशी एकतर्फी आघाडी घेत चित्र स्पष्ट केले होते. हेमंत बांदकर, तुषार आडीवडेकर आणि भारत ताम्हणकर यांनी आक्रमक चढाई व दमदार पकडींचे प्रदर्शन करताना प्रॉमिस संघाच्या विजयावर शिक्का मारला.