शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

फ्री वायफायमुळे तरुणांचे घोळके

By admin | Updated: April 6, 2016 01:15 IST

ज्या भागात फ्री वायफाय असेल, त्या भागात एका ठिकाणी जमायचे आणि एकमेकांना पासवर्ड की देऊन वायफाय वापरण्याचे फॅ ड शहरात सुरू झाले आहे.

पिंपरी : ज्या भागात फ्री वायफाय असेल, त्या भागात एका ठिकाणी जमायचे आणि एकमेकांना पासवर्ड की देऊन वायफाय वापरण्याचे फॅ ड शहरात सुरू झाले आहे. रात्रीच्या वेळी उद्याने, सोसायटीच्या भागात मित्रांचा घोळका एका ठिकाणी जमू लागला आहे. ज्या ठिकाणी अ‍ॅक्सेस मिळेल तेथे वायफाय सुरू करायचे आणि तास न् तास फ्री वायफायचा वापर करायचा. वायफाय मोफत क्षेत्रात आल्यानंतर मुलांना मध्यरात्री कधी झाली हे समजत नाही. इंटरनेटद्वारे अनेक चित्रपट, तसेच व्हिडीओ व फाइल्स डाऊनलोड करतात. फ्री वायफायचा कोड खूप मोठ्या प्रमाणात शेअर झाला तर तो आटोक्यात आणणे अवघड आहे. कारण तो एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत जातो. यामुळे याची नोंद होत नाही. एखादा गुन्हा घडल्यास फ्री वायफाय नेटचा वापर करून केला असल्यास तो शोधणे अवघड होते. फ्री वायफायचा पासवर्ड सुरक्षित राहिला नाही, हे यावरून निष्पन्न होते. रात्रीच्या वेळी असे मुलांचे घोळके ज्या ठिकाणी असतील त्या भागात नियंत्रण व सुरक्षितता ठेवणे आवश्यक आहे. दिवसेंदिवस असे घोळके वाढत गेल्यास सोशल मीडियातून वाढणाऱ्या गुन्ह्यांवर वचक बसविणे अवघड होईल. यासाठी वायफाय धोक्याचे ठरत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडे आर्थिक बाबींची चणचण जाणवत असते. अशा वेळी नेट वापरण्यासाठी पैसा अपुरा पडतो. अशा वेळी फ्री वायफायचा लाभ घेणे अपरिहार्य ठरते. यामुळे मित्रमंडळीही एकमेकांना फोन करून फ्री वायफाय वापरण्यासाठी आमंत्रण देतात. अमर्यादित नेट अ‍ॅक्सेस असल्याने कितीही वेळ वापरल्यास पैसे जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही.सध्या यमुनानगर, निगडी, चिंचवड, पिंपरी आदी भागात फ्री वायफायचा लाभ घेण्यासाठी मुले एकत्र जमत आहेत. मात्र, वायफाय वापरण्यासाठी सुरुवातीला राउटर सेट केलेला असतो. त्यामध्ये यूआरएल व डोमेननेम सेटअप असतो. वायफाय वापरण्यासाठी मोबाइल नंबर सेट करून घ्यावा लागतो. त्यानंतर पासवर्ड की मिळते, त्यातून संबंधित राउटरमध्ये मोबाइलसंबंधी माहिती जमा होते. त्यावरुन राऊटरवर कितीजण वायफायचा लाभ घेत आहेत हे समजते. शासकीय वेबसाइट्स किंवा अश्लील वेबसाइट या काही वायफाय क्षेत्रातच ब्लॉक केलेल्या असतात. मात्र, सर्व ठिकाणी पोर्न साईट्सचा अ‍ॅक्सेस वायफायमधून बंद केलेला असतोच असे नाही.(प्रतिनिधी)