शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘तरुणांनी वाचन वाढवावे’

By admin | Updated: June 30, 2016 02:32 IST

तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे.

सागर नेवरेकर,

मुंबई- तरुणपिढीचे वाचन आणि लेखन हे सध्या मोबाइलपुरतेच सीमित राहिले आहे. वाचनाने ज्ञानात भर पडत असल्याने तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. मात्र तंत्रज्ञान युगात तरुणपिढीचे वाचन कमी झाले आहे, अशी खंत विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व्यक्त केली. निमित्त होते ते साठ्ये महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेचे.विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयात २७ ते २९ जून दरम्यान बीएमएम मराठी विभाग पुरस्कृत ‘दर्पण मिडीया क्लब’ आणि ‘साहित्य रसग्रहण क्लब’ने व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. पहिल्या दिवशी गझलकार प्रदीप निफाडकर यांनी तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे अभिनेते रमेश भाटकर आणि लाईफ कोच लीना परांजपे यांनी संवाद साधला.प्रदीप निफाडकर म्हणाले, वाचन हे खुप महत्वाचे आहे. वाचनाने कवी घडतो. गझलेसाठी वाचन महत्त्वाचे असते. तरुणांनी वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. रमेश भाटकर म्हणाले, तरुणाईला समाजातील वास्तवाचे भान असावे. वाचनाला बंधन नसावे, जे मिळेल ते वाचत गेले पाहिजे. कोणत्या वयात काय वाचावे हे माहीत नसेल तर जाणकारांचा सल्ला घ्यावा. मराठी माध्यमातील मुलांनी इंग्रजी पुस्तकेही वाचली पाहिजेत. मराठी मुले इतर भाषांमध्ये मागे राहता कामा नयेत.लीना परांजपे म्हणाल्या, मुलांनी कुठल्याही भाषेची भीती बाळगता कामा नये. मुलांनी कोणती पुस्तके वाचली, त्यातून ते काय शिकले आणि त्या गोष्टी किती अमलात आणल्या, हे एकमेकांशी शेअर केले पाहिजे. जे क्षेत्र आपल्याला आवडते त्या क्षेत्रातील वाचन जरुर करावे. प्रेरणादायी पुस्तके वाचावीत. वाचन करताना संयम ठेवला पाहिजे. मुलांनी प्रेरणादायी पुस्तके वाचली पाहिजेत. मराठी माध्यमातील मुलांचे इंग्रजी चांगले नसल्यास त्यांच्या मनात इंग्रजी भाषेबद्दल न्यूनगंड निर्माण होतो, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)