शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील तरुणांकडून अमेरिकनांना गंडा

By admin | Updated: February 9, 2016 04:48 IST

संगणकामध्ये व्हायरस असल्याचे सांगून तो काढून देण्याच्या बहाण्याने लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. हा बीपीओ चालविणाऱ्या

पुणे : संगणकामध्ये व्हायरस असल्याचे सांगून तो काढून देण्याच्या बहाण्याने लाखो अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बीपीओ सेंटरचा पर्दाफाश झाला आहे. हा बीपीओ चालविणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.आदित्य रवींद्र राठी (वय २५, रा. बावधन), हरीश नारायणदास खुशलानी (वय २६, रा. पिंपरी) आणि रितेश खुशाल नवानी (वय २९, वाघेरा कॉलनी, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनी अमेरिकेतील ५ ते १० लाख नागरिकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. बावधन येथील कोलते-पाटील प्लाझामध्ये असेलल्या आयस्पेसमध्ये एका बीपीओ सेंटरमधून मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता. गुन्हे शाखेकडील सायबर सेल व संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे सेंटरमध्ये छापा टाकण्यात आला. तिघेही हे बीपीओ सेंटर चालवत होते. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे नाव वापरून त्यांनी अमेरिकन नागरिकांचा डाटा मिळविला होता.या नागरिकांना ते व्हीओआयपी कॉलची सुविधा वापरून फोन करत असत. याआधारे ते हा फोन अमेरिकेतूनच आला असल्याचे भासवत असत. फोनद्वारे ते संबंधितांना आपल्या संगणकामध्ये व्हायरस आहे, तो काढायचा आहे असे खोटे सांगायचे. त्याआधारे ते टिम व्हीवर या सॉफ्टवेअरच्याद्वारे संगणकामध्ये प्रवेश करत होते. त्यानंतर नागरिकांच्या बँकेच्या खात्याची संवेदनशील माहिती मिळवून त्याचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापर करून डॉलरमध्ये रक्कम मिळवीत होते. पोलिस तपासात ही सर्व माहिती निष्पन्न झाली आहे. अपर पोलिस आयुक्त सी. एच. वाकडे, पोलिस उपायुक्त दिपक साकोरे, सहायक पोलिस आयुक्त किशोर नाईक, पोलिस निरीक्षक सुनिल पवार, मिलिंद गायकवाड, सहायक पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, पोलिस कर्मचारी राजकुमार जाबा, उमेश शिंदे, किरण अब्दागिरे, नितीन चांदणे, अश्विन कुमकर, सरिता वेताळ यांच्या पथकाने ही कारवाई केली. (प्रतिनिधी) लाखो अमेरिकनांना फसवले...प्रत्येक नागरिकाकडून ते सुमारे ३०० डॉलर घेत होते. त्यांनी सुमारे १० लाख अमेरिकन नागरिकांना अशा प्रकारे गंडवल्याचे समजते. या तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.