शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळचा तरुण अखेर परतला घरी

By admin | Updated: June 28, 2016 02:49 IST

घरात भांडणे करून तो थेट मुंबईत निघून आला. कुठे जातो ते घरात कुणालाच सांगितले नाही.

प्रज्ञा म्हात्रे,

ठाणे- घरात भांडणे करून तो थेट मुंबईत निघून आला. कुठे जातो ते घरात कुणालाच सांगितले नाही. गावातील केवळ एका नातलगाला आपण मुंबईला पोटापाण्याकरिता जात असल्याचे त्याने सांगितले होते. मात्र, सायकोसीस आजाराने ग्रस्त असलेला तो थेट प्रादेशिक मनोरुग्णालयातच पोहोचला. मात्र, आता त्याचा आजार नियंत्रणात आल्याने त्याची नेपाळला घरवापसी करण्यात आली.ठाण्यातील जांभळीनाका येथे लोकांना शिवीगाळ करताना, गाड्यांवर दगडफेक करताना पोलिसांना तो आढळला होता. परंतु, काम शोधण्याकरिता तो ठाण्यात कसा आला आणि ठाण्यातून रुग्णालयात कसा आला, हे मात्र अजूनही त्याला आठवत नाही. सोमवारी रुग्णालयातून त्याला घरी नेण्याकरिता त्याचे आईवडील आले होते. ही कथा आहे नेपाळच्या एका छोट्या गावात राहणाऱ्या ४० वर्षीय इसमाची. नेपाळच्या एका छोट्या गावात हा इसम राहत आहे. त्याचे आईवडील, दोन मुले, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत हे कुटुंब जगत आहे. घरातील कर्ता न सांगता निघून गेला आणि जेव्हा त्याचा ठावठिकाणा लागला, तेव्हा तो मनोरुग्णालयात आहे, असे समजल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, दुसरीकडे त्याला भेटण्याची आसही होती. रुग्णालयाकडून त्याला नेण्यासाठी काही दिवसांनी या, असे सांगितले असले तरीदेखील त्याचा मुलगा वडिलांना भेटण्यासाठी हट्ट करीत होता. त्याने तर अन्नपाणीच सोडले होते. त्यामुळे या इसमाच्या आईवडिलांनी रुग्णालय गाठले. सोमवारी त्यांनी आपल्या मुलाला रुग्णालयातून घरी नेले. १५ मे रोजी ठाणेनगर पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही करून त्याला प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या नीलिमा केसरकर या त्याच्यावर उपचार करीत होत्या. सुरुवातीला त्यांनी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला धड काहीच सांगता येत नव्हते. हळूहळू त्याने नाव सांगितले. मात्र, घरचा पत्ता द्यायला तयार नव्हता. घरच्यांना बोलवू नका, असे तो सतत सांगत होता. १५ दिवसांपूर्वी त्याने पूर्ण पत्ता दिला.तीन महिन्यांपूर्वी नेपाळहून तो गोरेगाव येथील फिल्म सिटी येथे पेंटर म्हणून काम करण्यासाठी आपल्या मित्रांसोबत आला होता. याव्यतिरिक्त तो काहीही सांगू शकत नाही. पत्ता समजल्यावर रुग्णालयाने तेथील स्थानिक पोलिसांना फोन करून त्याच्या घरच्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्याचदिवशी पोलीस त्याच्या घरी गेले व तो सापडल्याचे सांगितले.>मुलाला पाहताच आईच्या आनंदाला पारावार उरला नाहीवडिलांना भेटायला उतावीळ असलेल्या त्याच्या मुलाचा फोन केसरकर यांच्या मोबाइलवर आला. त्या मुलाने माझे वडील तुमच्याकडे आहेत का, अशी विचारणा केली. वडिलांचा शोध लागल्यावर त्यांना भेटायचेच, असा धोशाच लावला. तब्बल चार दिवस त्यांनी प्रवास केला. खिशात पुरेसे पैसे नसल्याने त्यांनी या प्रवासादरम्यान काहीही खाल्ले नाही. त्यांच्याकडे धड छत्रीही नव्हती. मुलाला पाहताच त्याच्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. त्याला १० ते १२ वर्षांपूर्वीही असाच आजार झाला होता. त्यावेळी तो कुटुंबाला मारहाण, शिवीगाळ करायचा. मात्र, आता तो बरा झाला असून त्याच्या कुटुंबीयांना औषधे सुरू ठेवण्यास सांगितले असल्याचे केसरकरांनी सांगितले.