शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

फडणवीसांसोबत tik tok व्हिडिओ बनवण्यासाठी 'तो' पोहचला थेट विधानभवनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 16:49 IST

दिपक खंडाळे नावाच्या एका व्यक्तीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा असाच एक tik tok व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

- मोसीन शेख 

मुंबई : एखाद्या मोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटो किंवा सेल्फी काढून सोशल मिडियावर टाकण्याचा क्रेज सध्या तरुणांमध्ये पाहायला मिळतोय. मग त्यासाठी त्यांची धडपड पाहण्यासारखी असते. असाच एका कार्यकर्त्याचा tik tok व्हिडिओ व्हायरल झाला असून, या 17 सेकंदाच्या व्हिडिओसाठी या कार्यकर्त्याने चक्क 400 किलोमीटरचा प्रवास केला.

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने सर्वच पक्षाचे आमदार सध्या विधानसभा आणि विधानपरिषदेत उपस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्ते यावेळी आपली कामे घेऊन त्यांना भेटायला येत असतात. अशावेळी ही भेट स्मरणात राहावी आणि नेत्यासोबतच्या भेटीचा फोटो सोशल मिडियावर टाकण्यासाठी कार्यकर्ते फोटो, व्हिडिओ किंवा सेल्फी काढण्याची संधी सोडत नाही.

दिपक खंडाळे नावाच्या एका व्यक्तीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा असाच एक tik tok व्हिडिओ व्हायरल झाला आहे. खंडाळे हे चाळीसगाव जिल्ह्यातील उंबरखेड येथील राहणारे आहे. फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचासोबत tik tok व्हिडिओ बनवण्याची अनेक दिवसांपासूनची त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा शुक्रवारी पूर्ण झाली.

@dipakkhandale123

माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सोबत एक निवांत क्षण##treanding##rakhibirade माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यासोबत एक निवांत क्षण##virelvideo

♬ मूळ ध्वनी  - Dipak khandale

चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पुढाकाराने खंडाळे यांची भेट फडणवीस यांच्यासोबत झाली. त्यामुळे खंडाळे यांनीही वेळ वाया न घालवता फडणवीस यांच्यासोबत व्हिडिओ बनवला आणि tik tok वर पोस्ट केला. त्यांनतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे याआधी फडणवीस यांच्या विधानसभेतील भाषणाची कॉपी करत खंडाळे यांनी अनेकदा व्हिडिओ बनवले आहे. मात्र आता थेट फडणवीस यांच्यासोबतच व्हिडिओ बनवण्याची संधी मिळाल्याने त्यांनी आमदार चव्हाण यांचे आभार मानले.