शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणाने केले महिलेवर ब्लेडने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:04 IST

एकतर्फी प्रेमामधून दारुच्या नशेमध्ये घरामध्ये आलेल्या तरुणाने मुलीच्या आईकडे चहा आणि पाणी मागत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 04 - एकतर्फी प्रेमामधून दारुच्या नशेमध्ये घरामध्ये आलेल्या तरुणाने मुलीच्या आईकडे चहा आणि पाणी मागत तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. दोन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. जखमी महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
अक्षय काशिनाथ धनवे (वय १९, रा. किष्किंदानगर, कोथरुड) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या महिलेचा फुले आणि हार विक्रीचा व्यवसाय आहे. त्या पती, मुलगा आणि मुलीसह राहण्यास आहेत. तर त्यांच्या जवळच राहणारा आरोपी धनवे हा फुलांचे गुच्छ विक्रीचा व्यवसाय करतो. आरोपी या महिलेच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करतो. 
बुधवारी रात्री ही महिला आणि त्यांची मुलगी घरामध्ये हार विणत बसलेल्या होत्या. त्यावेळी धनवे दारुच्या नशेमध्ये त्यांच्या घरी गेला. त्यांची विचारपूस करीत ख्यालीखुशाली विचारली. 
त्यांनी त्याला घरामध्ये बोलावून बसायला सांगितले. त्याने पिण्यासाठी चहा मागितला. परंतु तो दारु प्यायलेला असल्यामुळे मुलीने घरामध्ये दुध शिल्लक नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने कोरा चहा दिला तरी चालेल असे म्हटल्यावर चहा बनविण्यासाठी ही महिला स्वयंपाकघरामध्ये गेल्या. तेव्हा आरोपीही त्यांच्या मागोमाग स्वयंपाकघरामध्ये गेला. त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी दिल्यानंतर गॅसवर चहा ठेवत असतानाच त्याने हातामधील ब्लेडने या महिलेच्या गळ्यावर दोनदा वार केले. काही कळायच्याआतच धनवे तेथून पसार झाला. 
त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात करताच मुलगी आतमध्ये धावली. आईने सांगितल्याप्रमाणे तिने मोठ्या भावाला फोन करुन बोलावून घेतले. धावत आलेल्या मुलाने त्यांना उचलून बाहेर नेत आॅटोरिक्षाने रुग्णालयामध्ये नेले. तेथे त्यांना दाखल करुन उपचार सुरु करण्यात आले. त्याने महिलेच्या मुलीवर असलेले एकतर्फी प्रेम हे या हल्ल्यामागील असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीने पोलिसांना दिलेल्या जबाबात ही बाब मान्य केली आहे. त्याला तात्काळ अटक करण्यात आली आहे.