शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत जिवंत बॉम्ब घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

By admin | Updated: September 10, 2015 02:24 IST

विक्रीतून चांगले पैसे मिळतील, या आशेने जिवंत हातबॉम्ब जवळपास महिनाभर घरी ठेवणाऱ्या तरुणास वाकड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला.

पिंपरी : विक्रीतून चांगले पैसे मिळतील, या आशेने जिवंत हातबॉम्ब जवळपास महिनाभर घरी ठेवणाऱ्या तरुणास वाकड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बॉम्बशोधक पथकाने त्याच्याकडून बॉम्ब हस्तगत केला. मासेमारीसाठी गेलेल्या काळेवाडीतील एका लहान मुलाला नदीपात्रालगत महिनाभरापूर्वी एक वस्तू आढळली. कुतूहल म्हणून ती त्याने घरी नेली. त्याच्या शेजारी राहणाऱ्या विक्की अशोक सावंत (२५) याने ही वस्तू पाहिली. हा हातबॉम्ब आहे, हे त्याच्या लक्षात आल्यानंतर विक्कीने त्या मुलाकडून तो काढून घेतला आणि सर्वांच्या नकळत त्याच्या विक्रीचा घाट घातला. त्याची किंमत तीन लाख रुपये त्याने निश्चित केली.हा हातबॉम्ब घेऊन तो ग्राहकांच्या शोधात फिरत राहायचा. खबऱ्याने ही माहिती पोलिसांना दिली. चतु:शृंगी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त डी. जी. वाळुंजकर यांनी शोध घेण्यास पोलीस पथक पाठविले. मागावर असलेल्या पोलिसांनी दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास संशयावरून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे बॉम्ब सापडला. तो जिवंत हातबॉम्ब असल्याचे निदर्शनास आले. विक्कीला अटक करण्यात आली असून, बॉम्ब खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीत पाठविण्यात आला आहे.