शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

डोंबिवलीजवळ चालत्या लोकलमधून पडल्याने तरूण मृत्यूमुखी

By admin | Updated: November 28, 2015 11:20 IST

गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमधून पडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य रेल्वेवरील दिवा-कोपर स्थानकांदरम्यान घडली आहे.

ऑनलाइन लोकमत

डोंबिवली, दि. २८ - गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमुळे आणखी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य रेल्वेवरील डोंबिवलीजवळ घडली आहे. गर्दीमुळे लोकलच्या दरवाज्यात लटूकन प्रवास करणा-या तरूणाचा हात सुटल्याने तो चालत्या गाडीतून ट्रॅकवर पडला आणि त्यातच त्याचा अंत झाला आहे.  भावेश नकाते असे मृत तरूणाचे नाव असून काल ( शुक्रवार) ही घटना घडली.

भावेशने काल सकाळी कर्जतहून सीएसटीला जाणारी गाडी डोंबिवली स्थानकातून पकडली खरी, पण प्रचंड गर्दीमुळे त्याला आत जाता न आल्याने त्याला दरवाज्यातच खांबाला पकडून उभे रहावे लागले. गाडी सुटल्यावर तो प्रवाशांना तो आत जाण्यास सांगत होता, मात्र गर्दीमुळे कोणालाच हलता येत नव्हतं. कोपर-दिवा स्थानकांदरम्यान गर्दीचा रेटा एवढा वाढला की भावेशचा खांबावरील हात निसटला आणि तो चालत्या गाडीतून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताबद्दल मध्य रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. 

या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.