शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

दिग्गजांसह युवा कलाकार

By admin | Updated: November 29, 2014 00:13 IST

नऊ नव्या पिढीच्या कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.

पुणो : संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, पं. जसराज, पं. उल्हास कशाळकर, गायिका मालिनी राजूरकर यांसारख्या संगीतातील दिग्गज  शिरोमणींसह सुंद्रीवादक भीमण्णा जाधव, श्रीवाणी जडे, सानिया पाटणकर, धनंजय देगडे, अंबी सुब्रrाण्यम आदी नऊ नव्या पिढीच्या कलाविष्कारांचा सुरेल संगम यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.  महोत्सवात प्रथमच सुरेश वाडकर यांची सादर होणारी अभिजात संगीताची मैफिल हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. 
गायन, वादन आणि नृत्य याच्या त्रिवेणी मिश्रणातून साकार झालेला 62वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे येत्या 11 ते 14 डिसेंबरदरम्यान न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे रंगणार आहे. 
महोत्सवाचे वेळापत्रक आणि कलाकारांची नावे शुक्रवारी मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. महोत्सवात तब्बल 25 कलाविष्कार आणि 25हून अधिक नामवंत आणि युवा कलाकार सहभागी होणार  आहेत.  (प्रतिनिधी)
 
4महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची  (दि. 11 डिसेंबर) सुरूवात सोलापूरचे नावाजलेले सुंद्रीवादक सूरमणी भीमण्णा जाधव यांच्या सुरेल वादनाने होणार आहे. त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या शिष्या सानिया पाटणकर यांचे गायन आणि बनारस घराण्याचे ज्येष्ठ गायक राजन-साजन मिश्र यांचे शिष्य दिवाकर-प्रभाकर कश्यप या बंधूंचे सहगायन रसिकांना ऐकता येणार आहे.पंडित शिवकुमार शर्मा यांच्या संतूरवादनांच्या जादुई सुरांनी उत्तरार्धाची सांगता होईल. 
 
4रमाकांत गायकवाड या युवा कलाकाराच्या गायनाने दुस:या दिवसाचा (दि. 12) प्रारंभ होणार असून, दिल्लीच्या किराणा घराण्याच्या सुमित्र गुहा यांचे तसेच पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंद भाटे यांचे गायन त्यानंतर होईल. प्रख्यात भरतनाटय़म नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा नृत्याविष्कारही रसिकांना या वेळी अनुभवायला मिळणार असून, पतियाळा घराण्याचे गायक पं. अजय पोहनकर यांच्या गायनाने दुस:या दिवशीचा समारोप होईल. 
 
4किराणा घराण्याचे गायक परमेश्वर हेगडे यांच्या शिष्या श्रीवाणी जडे यांचे गायन, पं. रविशंकर यांच्या शिष्या मंजू मेहता यांचे सतारवादन तसेच त्यांचे शिष्य पार्थो सारथी यांचे सरोदवादन अशी सहवादनाची पर्वणी रसिकांना तिस:या दिवशी (दि.13) मिळणार आहे. त्यानंतर पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी यांचे गायन होईल. ‘धृपद संच’ या अनोख्या कलाविष्काराची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. गुंदेचा बंधू व त्यांचे शिष्य बासरी आणि सेक्सोफोन या वाद्यांसहित धृपद गायनाचे सादरीकरण करणार आहेत. पं. उल्हास कशाळकर यांच्या गायनाने उत्तरार्धाची समाप्ती होईल. 
 
4महोत्सवाचा शेवटचा दिवस (दि. 14 डिसेंबर) सकाळ आणि सायंकाळ अशा दोन सत्रंत रंगणार आहे. सकाळच्या सत्रत धनंजय हेगडे यांचे गायन, रूद्रवीणा वादक बहुद्दीन डागर यांचे वादन होईल. ज्येष्ठ गायिका मालिनी राजूरकर यांची अभिजात गायकी रसिकांना अनुभवायला मिळेल. 
 
4सायंकाळच्या सत्रला प्रसिद्ध व्यायोलिनवादक डॉ. एल. सुब्रrाण्यम यांचे चिरंजीव अंबी सुब्रrाण्यम यांच्या व्हायोलिनवादनाने सुरूवात होणार आहे. ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका मीता पंडित, सवाई गंधर्व यांच्या नातसून पद्मा देशपांडे यांच्या गायनानंतर सुरेश वाडकर यांची मैफिल महोत्सवात प्रथमच सादर होईल. यानंतर पूर्बायन चॅटर्जी यांचे सतारवादन होणार आहे. किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने महोत्सवाची सुरेल सांगता होईल.