शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

आपणच घोटतोय वसुंधरेचा गळा!

By admin | Published: July 05, 2015 3:00 AM

मान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि

- डॉ. राजेंद्र सिंह(लेखक मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत.)शब्दांकन - सचिन लुंगसेमान्सून उत्तरेकडे सरकत असताना पाकिस्तानात पश्चिमी प्रकोप येणे, परिणामी उष्णतेच्या लाटेत वाढ होऊन कमाल तापमानात वरचढ होणे, त्याचवेळी मान्सूनने देश व्यापणे आणि त्यानंतर मध्य भारतात पावसाचा खंड पडणे, याच घटना होत असताना पहाडांवर अतिवृष्टी होऊन पूर येणे, अशा गोष्टी सलग घडत आहेत. याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार झाला असेल आणि होतही असेल. परंतु याची पार्श्वभूमी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. नेमके आपण तेच तपासत नाही आणि येथेच गल्लत होते. मान्सून दाखल होण्यास झालेला विलंब, पाकिस्तानातील उष्णतेची लाट, मान्सूनने देश व्यापल्यानंतर पडलेला खंड, पहाडांवर होणारी अतिवृष्टी आणि ‘एल निनो’चा प्रभाव, या सगळ्या घटनांशी जागतिक तापमान वाढीचा संबंध नाही, असे कोणीही कितीही ओरडून सांगत असले तरी जागतिक तापमानवाढीमुळेच वातावरणात हे बदल होत आहेत, हे मी ठामपणे सांगू इच्छित आहे.आपण यापूर्वीही जागतिक तापमानवाढीच्या समस्येकडे दुर्लक्ष केले आहे. मान्सूनचा एक पॅटर्न असतो. मान्सूनपूर्व आणि मान्सूननंतर बदल अपेक्षित असतात, असे सांगण्यात येत असले तरी त्यामागची पार्श्वभूमी कोणीही समजावून घेत नाही. ऋतुचक्र बदलले आहे, बदलते आहे, हे आपण समजावून घेत नाही. आपण निसर्गाशी खेळतो आहोत. पाकमध्ये आलेली उष्णतेची लाट हे त्याचेच उदाहरण आहे. आपल्याकडे जेव्हा उन्हाळा होता तेव्हा देशात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सुमारे ५०० जणांचा बळी गेला होता. बळींमध्ये दक्षिण भारतातील नागरिकांचे प्रमाण अधिक होते. आता पाकिस्तानात आलेल्या हजारएक बळी गेले.जागतिक तापमानवाढ ही समस्या काही आज निर्माण झालेली नाही. आपण आपल्या वसुंधरेचा म्हणजे पृथ्वीचा गळा घोटला आहे, प्रदूषण वाढवले आहे, हिरवळ नष्ट केली आहे. आपण निसर्गाला जे देतो तेच निसर्ग आपणाला परत करीत असतो. जागतिक तापमान वाढ हा त्याचाच परिणाम आहे. जमिनीवरील झाडे नष्ट होतात. जमीन वाळवंटासारखी होते. जमिनीतील पाणी कमी होते. तेव्हा आपण त्यावर उपाय करण्याऐवजी समस्या आणखी वाढवत जातो. मध्य भारत असो किंवा आणखी काही. विदर्भ आणि मराठवाड्यात नेमके हेच झाले आहे. म्हणून तिथे पाऊस कमी आणि उष्णता वाढली आहे. जागतिक स्तरावरही सर्वच देशांना तापमानवाढीची झळ बसते आहे. दक्षिण आशियातील राष्ट्रांनाही जागतिक तापमान वाढीचे परिणाम भोगावे लागत आहेत. यावर उपाय म्हणजे आजारी पडलेल्या वसुंधरेला बरे करण्याची गरज आहे. पृथ्वीवरची नष्ट झालेली हिरवळ वाढविण्याची गरज आहे. आपण आपली जीवनशैली (लाइफ स्टाइल) बदलण्याची गरज आहे. असे झाले तर आपण निसर्गाशी एकरूप होऊ. जेव्हा आपण निसर्गाशी एकरूप होऊ तेव्हा कुठे निसर्ग आपणाला तारेल.