शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला बघून घेतो...

By admin | Updated: August 26, 2014 04:14 IST

२१ आॅगस्ट रोजी आरोपी आणि भाजप कार्यकर्ता परीक्षित धुमे याच्याविरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती.

मुंबई : २१ आॅगस्ट रोजी आरोपी आणि भाजप कार्यकर्ता परीक्षित धुमे याच्याविरोधात मुलुंडच्या नवघर पोलीस ठाण्यात कारवाई सुरू होती. तेव्हा किरीट सोमय्या यांनी धुमेच्या मोबाईलवर फोन केला आणि पोलीस निरीक्षक संपत मुंढेंना द्यायला सांगितला. मुंढे फोनवर आले तेव्हा ‘धुमेला पोलीस ठाण्यात का बोलावले़?’ असा प्रश्न विचारुन सोमय्यांनी त्यांना मोठमोठ्याने दमदाटी केली. मुंढे यांनी तक्रारीत हा घडलेला सगळा प्रकार सविस्तर नमूद केला. साडेतीनच्या सुमारास सोमय्या ५ ते ६ कार्यकर्त्यांसोबत पोलीस ठाण्यात आले. आत येताच ते गुन्हे प्रकटीकरण कक्षात आले. तेव्हा मुंढे यांनी सोमय्यांना नमस्कार केला आणि काय सहकार्य करू, असे विचारले. तेव्हा सोमैयांनी त्यांच्या हातावर फटका मारला. मुंढेंना धक्का देऊन ते प्रकटीकरण कक्षात शिरले. सोमैयांनी सोबतच्या कार्यकर्त्यांना या प्रकाराची व्हीडीओ शूटिंग करण्यास सांगितले. तसेच तुम्हाला बघून घेतो, अशी धमकीही दिली. सोमैया आरोपी धुमेला हाताला धरून पोलीस ठाण्याबाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते. तेव्हा मुंढे, अन्य पोलीस अधिकारी त्यांच्या पाठी धावले. साहेब तुम्ही असे करू नका, अशी विनंती पोलिसांनी केली. तेव्हा सोमय्यांनी 'माझ्या कार्यकर्त्याला मला विचारल्याशिवाय बोलावलेच कसे', असा सवाल केला. 'तुमच्याकडे वॉरंट आहे का?' अशी विचारणा करून पोलिसांशी हुज्जत घातली. यावेळी वरिष्ठ निरीक्षक गायकवाड यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर सोमय्या धुमेला घेऊन निघून गेले. माजी न्यायाधीश अनिल साखरे यांनी सांगितले, सोमय्यांकडून संसदेत हा गुन्हा घडला असता तर त्यांच्या अटकेसाठी लोकसभा सभापतींकडून परवानगीची आवश्यकता होती. तर सोमय्या खासदार असल्याने तपासानंतरच अटकेचा निर्णय घेतला जाईल, असे सरकारी वकील अ‍ॅड. मानकुंवर देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)