शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आप’ने पाठीत सुरा खुपसला

By admin | Updated: July 4, 2016 19:41 IST

आम आदमी पार्टीने आपल्या पाटीत सुरा खुपसल्याचा आरोप या पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविलेल्या आणि आता कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या स्वाती केरकर

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. ४ : आम आदमी पार्टीने आपल्या पाटीत सुरा खुपसल्याचा आरोप या पक्षाच्या उमेदवारीवर लोकसभा निवडणूक लढविलेल्या आणि आता कॉंग्रेसमध्ये दाखल झालेल्या स्वाती केरकर यांनी कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून केला.  पक्षात आपले महत्त्व वाढेल या भितीने लोकांच्या समस्या उचलून धरण्यास आप नेत्यांनी आपल्याला हरकत घेतल्याचे त्यांनी सांगितले. 
आम आदमी पक्ष हा आम आदमीचा पक्ष  असल्याच्या समजात कुणीही राहू नये, हा पक्ष बड्या लोकांचा आणि बड्या लोकांसाठीच आहे. सामान्य माणसांना त्यात स्थान नाही. त्यामुळे या पक्षाच्या नादाला कुणी न लागण्याचे आवाहन त्यांनी केले. हा पक्ष  सामाजिक कार्यकर्त्यांंचा आहे असे आपल्याला सांगण्यात आले होते. आपण मागील काही वर्षे सातत्याने सामाजिक चळवळीत असल्यामुळे हा पक्ष आपल्याला त्या दृष्टीने आधार वाटला होता. परंतु प्रत्यक्षात अपेक्षा भंग झाल्याचे त्यांनी सांगितले. 
आम आदमी पार्टीला राम राम ठोकून कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले आणखी एक युवा नेते अविनाश तावारीस यांनी ‘आप’ हा भाजपचीच टीम असल्याचे सांगितले. आपमधील कार्यकर्ते व नेते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील लोक असल्याचेही ते म्हणाले. आपला या पक्षात मोठा अपेक्षा भंग झाल्यामुळे पक्ष सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्याचे ते म्हणाले.
आपचे आणखी एक कार्यकर्ते नीळकंठ गावस यांनीही आपच्या कारभारावर टीका केली. गोव्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर हा पक्ष पैसे खर्च करतो आहे त कठून येत आहे याचे उत्तर त्यांनी अगोदर द्यायला हवे असे त्यांनी सांगितले. गावसही आप सोडून कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.