शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर शेतकऱ्याला जगवा, मग ‘स्वाभिमाना’चे बघू - डॉ. यशवंतराव थोरात

By admin | Updated: March 18, 2016 16:53 IST

राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर : राज्य सरकारने यंदाचा अर्थसंकल्प शेतकरी केंद्रित मांडला त्याचा आनंद असला तरी आजची खरी गरज शेतकऱ्याला जगविण्याची आहे, मग त्याच्या ‘स्वाभिमाना’चे बघू अशी प्रतिक्रिया नाबार्डचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ.यशवंतराव थोरात यांनी व्यक्त केली. कृषी क्षेत्राचा विकास दर उणे 2.7 टक्के असताना राज्य पुढे कसे जाणार अशी विचारणा त्यांनी केली.
थोरात म्हणाले,‘राज्य सरकारने बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद केली हे महत्वाचे नाही. तुम्ही जी तरतूद करता त्यातील एक एक रुपया त्या क्षेत्रासाठी किती प्रामाणिकपणे खर्च होणार हे जास्त महत्वाचे आहे. मला नुसते आकडे आणि तरतूदी नकोत. त्याची अंमलबजावणी कशी करणार हा कळीचा मुद्दा आहे. आज मराठवाडा,विदर्भात माणसे व जनावरेही पाण्यावाचून मरत आहेत. त्यांना पहिल्यांदा प्यायला पाणी  द्या. त्याला जगविण्यासाठी तुम्ही ‘वॉर फुटिंग’वर काय करणार आहात हे जास्त महत्वाचे आहे. कारण माणूसच जगला नाही तर त्याचा स्वाभिमान कसा जागृत करणार याचा विचार व्हावा. जो शेतकरी आज मरायला लागला आहे, त्यासाठी काही तरतूदी केल्या आहेत. जो श्रीमंत आहे, त्याला तुमच्या मदतीची गरज नाही. परंतू जो मधला शेतकरी आहे, त्याच्यासाठी सरकारने केलेल्या योजनांचा लाभ मिळवताना तोंडाला फेस येतो. म्हणून शेतीतील जाणत्या लोकांची मदत घेवून ज्या तरतूदी तुम्ही शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत, त्या खरेच त्यांच्यार्पयत पोहोचल्या का याचा आढावा घेतला गेला पाहिजे. असे सामाजिक लेखापरीक्षण झाल्याशिवाय नुसत्या तरतूदी काय कामाच्या नाहीत.’