शिर्डी : शेजारील राष्ट्रांशी लढाई करून प्रश्न मिटणार नाही तर चर्चेतूनच प्रश्न सोडवावे लागतील, असे सांगत आपण अद्यापही भाजपातच असल्याचे माजी केंद्रीय मंत्री व सिनेअभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.गेली अनेक दशके नियमितपणे साईदरबारी हजेरी लावणारे सिन्हा यांनी रविवारी सार्इंच्या मध्यान्ह आरतीला सपत्नीक हजेरी लावली़चर्चेमुळेच महाराष्ट्राचा पुत्र चंदू चव्हाण भारतात सुखरूप परतला आहे. आपल्या नेहमीच्या फिल्मी स्टाईलनेखामोश म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ नेते मा. गो. वैद्य यांच्या आरक्षणाच्या मुद्याला त्यांनी बगल दिली़ चर्चा काहीही असली तरी आपण अद्यापही भाजपातच आहोत. मात्र सिद्धूसारखी चांगली माणसे पक्ष सोडून जात आहेत़ त्याचा नेतृत्वाने विचार करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. नोटबंदीच्या मुद्यावर लगेच बोलणे घाईचे ठरेल, असेही ते म्हणाले़ (प्रतिनिधी)
आपण अद्यापही भाजपातच - शत्रुघ्न सिन्हा
By admin | Updated: January 23, 2017 03:57 IST