पुणे : ससून रुग्णालयातून पलायन केल्याप्रकरणी संशयित आरोपी योगेश राऊतला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत निमसे यांनी शुक्रवारी दोषी धरले. योगेश राऊत हा संगणक अभियंता नयना पुजारी सामूहिक बलात्कार आणि खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे.नयना पुजारी खूनप्रकरणी राऊतसह महेश ठाकूर, राजेश चौधरी, विश्वास कदम या चौघांना अटक झाली होती. चौघेही येरवडा कारागृहात होते. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात प्रलंबित असताना राऊतने अंगाला खाज सुटत असल्याचा बहाणा करून ससून रुग्णालयात दाखल झाला. लघवी करायला जाण्याच्या बहाणा करून १७ सप्टेंबर २०११ रोजी त्याने ससून रुग्णालयातून पलायन केले होते. सुमारे पावणेदोन वर्षे तो फरार होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत होती. त्याची माहिती देणाऱ्यास बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. योगेशला ३१ मे २०१३ रोजी शिर्डी बस स्थानकावर अटक केले. (प्रतिनिधी)
‘पलायन’प्रकरणी योगेश राऊत दोषी
By admin | Updated: May 16, 2015 02:45 IST