शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन

By admin | Updated: August 20, 2014 08:51 IST

योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २० - योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९६ वर्षांचे होते. किडनी निकामी झाल्याने अय्यंगार यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. अखेर बुधवारी पहाटे त्यांचे रुग्णालयात निधन झाले.  अय्यंगार योगाचे जन्मदाते असणा-या अय्यंगार यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 

बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म १९१८ साली कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर झाला. त्यांचे वडील श्री. कृष्णम्माचार शाळेत शिक्षक होते तर त्यांची आई शेषम्मा या गृहिणी, दोघांच्याही संस्कारांच्या छायेत त्यांचे बालपण गेले. मात्र लहनपणी ते बरेच आजारी असायचेय मलेरिया. टीबी, टायफइड या आजारांमुळे त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. ते पाच वर्षांचे असताना अय्यंगार यांचे कुटुंब बंगळुरू येथे स्थायिक झाले. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांच्या वडिलांचे निधन झाले 

१९३४ साली बी. के. एस. अय्यंगार म्हैसूरला गेले. तेथे त्यांनी मेव्हण्याच्या मार्गदर्शनाखाली योगासनांचे प्रशिक्षण घेतले, पथ्ये पाळली व आपली तब्येत सुधारली. पुढे त्यांनी योगासने करण्याचा आणि योगासनांशी संबंधित विषयांवर सखोल अभ्यास करण्याचाच निश्चय केला.  १९३७ साली १८ व्या वर्षी बी. के. एस. अय्यंगार योगासनांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पुण्यात आले आणि कायमचे तेथेच स्थायिक झाले.
अनेक मान्यवरांना त्यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले, त्यात जिद्दू कृष्णमूर्ती, राजकीय नेते जयप्रकाश नारायण, व्हायोलीन वादक येहुदी मेनुहिन यांचा समावेश होता. येहुदी मेनुहिन यांच्यामुळे अय्यंगार यांना लंडन, स्वित्झर्लंड, पॅरिस आणि विदेशात अनेक ठिकाणी योगासनांचे प्रशिक्षण वर्ग घेण्याची संधी मिळाली. 
अय्यंगार यांनी योगासनांशी संबंधित विषयांवर १४ पुस्तके लिहिली असून ती जगातील १७ प्रमुख भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. अय्यंगार योग, पातंजली योग, प्राणायाम या विषयांवरही त्यांनी विपुल लेखन केले होते. बी. के. एस. अय्यंगार यांच्या पत्नीच्या निधनानंतर १९७५ मध्ये त्यांनी रमामणी अय्यंगार यांच्या नावाने योगप्रशिक्षण संस्था सुरू केली. ही संस्था आजही हजारो नागरिकांना देशाविदेशात योगासनांचे प्रशिक्षण देते. 
केंद्र सरकारने अय्यंगार यांना १९९१ साली 'पद्मश्री', २००२ साली 'पद्मभूषण' व २०१४ मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित केले होते.