शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना शनिवारपासून योगाचे धडे

By admin | Updated: January 12, 2016 03:00 IST

कैद्यांचा ताण कमी करण्याच्या, तसेच त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्याभरात कारागृहातील कैद्यांना येत्या शनिवारपासून योगाचे

गडचिरोली : कैद्यांचा ताण कमी करण्याच्या, तसेच त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राज्याभरात कारागृहातील कैद्यांना येत्या शनिवारपासून योगाचे धडे देण्यात येणार आहेत. यासाठी कारागृह अधीक्षकांनी योग शिक्षकाची नेमणूक करावी, असे पत्र राज्याचे कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच कारागृह अधीक्षकांना पाठविले आहे.या संदर्भात ५ जानेवारी रोजी पतंजली योग समितीच्या पदाधिकाऱ्यांशी पुणे येथे महानिरीक्षकांच्या दालनात बैठक झाली. बैठकीत १६ जानेवारीपासून नियमित योग शिबिराचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले आहे. पतंजली योगसमिती व कारागृह प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिरांचे आयोजन राहणार आहे.कारागृह नियमांचे करावे लागणार पालनयोगशिक्षकांना प्रवेश देताना कारागृहाच्या नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्यासही अधीक्षकांना कळविण्यात आले आहे. योगासने सुरू असताना कारागृह अधीक्षक किंवा त्यांच्या प्रतिनिधीने प्रत्यक्ष उपस्थित राहावे, कोणत्याही कैैद्याचे किंवा परिसराचे छायाचित्र काढता येणार नाही. आक्षेपार्ह वस्तू कारागृहाच्या मेन गेटवरच जमा कराव्यात, कैद्यांशी अनावश्यक संपर्क टाळावा, आदी नियमांचे पालन करावे लागणार आहे.