शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यो यो हनीसिंगला न्यायालयाचा दणका

By admin | Updated: February 28, 2017 20:31 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी लोकप्रिय पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास नकार दिला. परिणामी हनीसिंगला जोरदार दणका बसला आहे.

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 28 - मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी लोकप्रिय पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगविरुद्धचा एफआयआर रद्द करण्यास  नकार दिला. परिणामी हनीसिंगला जोरदार दणका बसला आहे.
व्यावसायिक आनंदपालसिंग जब्बल यांच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व अन्य एक गायक बादशाह यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये एफआयआर नोंदविला आहे. सार्वजनिकरित्या गाता येणार नाही व संस्कारित व्यक्ती ऐकू शकणार नाही अशा अश्लील शब्दांमध्ये गाणी गायल्याचा हनीसिंगवर आरोप आहे. त्याची गाणी युट्युबवर उपलब्ध असल्याचे बोलले जात आहे. हा एफआयआर रद्द करण्यासाठी हनीसिंगने उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती भूषण गवई व इंदिरा जैन यांनी हनीसिंगची विनंती अमान्य करून अर्ज निकाली काढला. परंतु, पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर हनीसिंग याप्रकरणातून आरोपमुक्त होण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज दाखल करू शकेल असे न्यायालयाने स्पष्ट केले.
पोलिसांनी सुरुवातीला जब्बल यांच्या तक्रारीवर सहा महिन्यांपर्यंत काहीच कारवाई केली नव्हती. त्यानंतर जब्बल यांनी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली होती. पोलीस आयुक्तांनीही समाधानकारक कारवाई केली नाही. परिणामी, त्यांनी जेएमएफसी न्यायालयात तक्रार दाखल केली होती. जेएमएफसी न्यायालयाने पोलिसांचा तपास सुरू असल्याचे सांगून तक्रार खारीज केली होती. त्यानंतर जब्बल यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर पोलिसांनी दोन्ही गायकांविरुद्ध एफआयआर नोंदविला. हनीसिंगतर्फे अ‍ॅड. अतुल पांडे, जब्बल यांच्यातर्फे अ‍ॅड. रसपालसिंग रेणू तर, शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता तहसीन मिर्झा यांनी बाजू मांडली.