शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहातही भरणार आठवडी बाजार!

By admin | Updated: January 3, 2017 04:47 IST

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी बुधवारपासून संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार सुरू होणार आहे.

मुंबई : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील पोलीस कर्मचारी वसाहतीसाठी बुधवारपासून संत शिरोमणी सावता माळी आठवडी बाजार सुरू होणार आहे. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांच्या प्रयत्नांमुळे पोलिसांना थेट शेतकऱ्यांकडून स्वस्त व ताजा भाजीपाला मिळणार आहे. या उपक्रमामुळे नव्या वर्षात शेतकरी व पोलिसांचे भावबंध जोडले जाणार आहे. राज्याच्या गृह मंत्रालयाअंतर्गत येणारे येरवडा कारागृह प्रशासन आठवडी बाजाराचा उपक्रम सुरू करणारा शासनाचा राज्यातील पहिला विभाग ठरला आहे. मुंबईत विधान भवनाच्या प्रांगणात पहिला आठवडी बाजार सुरू झाल्यानंतर राज्यात ठिकठिकाणी हे बाजार सुरू होत आहे. आठवडी बाजारामुळे कोणत्याही मध्यस्थाविना शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होत आहे. येरवडा कारागृह येथील वसाहतीत सुमारे ९०० पोलीस अधिकारी व कर्मचारी कुटुंबासह राहतात. पोलिसांससह परिसरातील रहिवाशांना दर बुधवारी शेतकऱ्यांकडून ताजा भाजीपाला, फळे, कडधान्ये व विशेष म्हणजे बाजारभावापेक्षा कमी दरात दूध मिळणार आहे, असे या उपक्रमाच्या समन्वयक व पश्चिम विभागाच्या कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. उपक्रमाबद्दल माहिती मिळाल्यानंतर स्वाती साठे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन केले. कृषी, पणन व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येरवडा कारागृहाच्या अर्जाला तातडीने मंजुरी दिली. बुधवारी दुपारी कारागृह कर्मचारी वसाहतीच्या मोकळ््या जागेत राज्यमंत्री सदाभाऊ खोत व कारागृह महानिरीक्षक डॉ. भूषण कुमार यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. (प्रतिनिधी)