शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा हज यात्रेसाठी अर्ज भरा आॅनलाइन!

By admin | Updated: January 17, 2015 03:41 IST

आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रा करावी, अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते. मर्यादित जागांमुळे अनेकांना हज यात्रेसाठी जाता येत नाही.

औरंगाबाद : आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रा करावी, अशी मुस्लिम बांधवांची इच्छा असते. मर्यादित जागांमुळे अनेकांना हज यात्रेसाठी जाता येत नाही. हज यात्रा २०१५ या वर्षासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १९ जानेवारीपासून सुरू होत आहे. हज कमिटी आॅफ इंडियाने यंदा भाविकांना अर्ज आॅनलाईन भरण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे दहा वर्षे वैध असलेला पासपोर्ट सोबत जोडणे आवश्यक आहे.हज यात्रेसाठी गतवर्षी महाराष्ट्रातून ४८ हजार नागरिकांनी अर्ज केला होता. त्यातील फक्त ८ हजार यात्रेकरूंनाच संधी मिळाली होती. तीन वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राच्या वाट्याला १० हजारांहून अधिक जागा येत होत्या. महाराष्ट्राचा कोटा दोन हजारांनी कमी करण्यात आल्याने हज कमिटीमार्फत यात्रेला आपला क्रमांक लागावा म्हणून स्पर्धा वाढली आहे.१९ जानेवारीपासून भाविकांना आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरता येईल. शिवाय हार्ड कॉपीमध्येही अर्ज भरून स्टेट हज कमिटीकडे द्यावा लागेल. यात्रेकरूंना हज यात्रेसाठी लागणारी रक्कमही आॅनलाईन भरून द्यावी लागेल. २० फेबु्रवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यांनी यापूर्वी कधीच हज केलेले नाही अशा भाविकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून सतत अर्ज केल्यानंतरही ज्यांचा हज यात्रेसाठी नंबर लागला नाही, त्यांना यंदा संधी मिळणार आहे.नियोजित जागांपेक्षा अधिक अर्ज आल्यास लॉटरी पद्धतीने अर्ज काढण्यात येतील. १६ ते २४ मार्चदरम्यान ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती मरकज- ए- हुज्जाज कमिटीचे करीम पटेल यांनी दिली. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात सुमारे ८१ हजार रुपयांचा पहिला टप्पा भाविकांना जमा करावा लागेल. १७ आॅगस्ट २०१५ पासून हज यात्रेकरूंचे पथक् रवाना होईल. २२ सप्टेंबरपासून पवित्र हज यात्रेला सुरुवात होणार आहे. (प्रतिनिधी)