शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

यंदाच्या दिवाळीवर मंदीचे सावट!

By admin | Updated: October 31, 2016 03:36 IST

दिवाळीसाठी मनोरचा बाजार फुलला मात्र त्यात चायनाच्या वस्तूंप्रमाणेच ग्राहकांनाही खो बसलेला दिसत होता.

मनोर : दिवाळीसाठी मनोरचा बाजार फुलला मात्र त्यात चायनाच्या वस्तूंप्रमाणेच ग्राहकांनाही खो बसलेला दिसत होता. स्वदेशी वस्तूंना दुकानदारांनी पसंती दिली होती परंतु त्यांच्या खरेदीसाठी ग्राहक मात्र येत नव्हते. फॅन्सी फटाक्यांचा अपवाद वगळता अन्य वस्तूंच्या विक्रीवर मंदीचे सावट होते. पन्नास ते साठ गावासाठी मनोर ही एकमेव बाजार पेठ असून बाजारात लोकांची गेल्या तीन दिवसांपासून ये-जा सुरु होती. यंदा सर्व फटाक्यांच्या दुकानांनी चायनीज फटाक्यांवर बहिष्कार टाकला होता. अन्य दुकानेही स्वदेशी मालाने भरलेली असली तरी ग्राहक फारसे नसल्याने दिवाळीच्या आधी आठ दिवस भरणारा हा बाजार यंदा फक्त तीन दिवस भरला. त्यावरही मंदीचे सावट होते. मनोर परिसर हे ग्रामीण भाग असल्याने येथील आदिवासी, कुणबी समाज मोठया प्रमाणात भात शेती करतो त्या भात व गवत विक्र ीतून येणाऱ्या पैशावरच तो दिवाळी साजरी करतो. परंतु यंदा भात व गवत कापणी वेळेवर न झाल्याने बिकट आर्थिक परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेकांना दिवाळीची खरेदी हवीतशी करता आली नाही. लोकांकडे पैसेच नसल्याने दुकानातील माल पाहिजे तसा खपला नाही . त्यामुळे माल पडून राहणार आहे व त्यातील गुंतवणूकही अडकून राहणार आहे. असे सुनील लोखंडे, कांतीलाल जैन, सचिन घोलप, विनोद जैन, विवेक लोखंडे, स्वप्नील यादव, संतोष लोखंडे व इतर दुकानदारांनी लोकमतला सांगितले. >आत्ताशी खरेदी केंद्रे सुरूसंपूर्ण पालघर जिल्ह्यात एकाधिकार भात खरेदीची केंद्रे रविवारी सुरू झालीत. तरी त्यांचा दिवाळीच्यादृष्टीने शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही. कारण अजून भाताचे पीक हाती आले नाही. ते येण्यास आठ दिवस जातील. नंतर खरेदी होईल व तिचे पैसे हाती कधी येतील याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच जाणार आहे.