शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

यंदा १५ दिवस आधीच पाणीटंचाई

By admin | Updated: May 2, 2016 00:44 IST

दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे तसतशी पाण्याची पातळी देखील जलदगतीने घटत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्रोतच आटल्याने संगमेश्?वर तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषणता

- सचिन मोहिते,  देवरुख

दिवसेंदिवस पारा जसा वाढत आहे तसतशी पाण्याची पातळी देखील जलदगतीने घटत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्रोतच आटल्याने संगमेश्?वर तालुक्यामध्ये पाणीटंचाईची भीषणता जाणवू लागली आहे. पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. संगमेश्?वर तालुक्यामध्ये गतवषीर्चा विचार केल्यास १ एप्रिलपासून तब्बल १५ दिवस आधीच टँकर सुरु झाला आहे. यावर्षी पाणीटंचाई किती भीषण आहे, हे स्पष्ट होत आहे.तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर १ एप्रिलला पाणीटंचाईग्रस्त गावातील वाड्यांंमध्ये टँकर धावू लागला. या दिवसापासून सहा गावांतील १0 वाड्यांना केवळ एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. हा शासकीय टँकर १ दिवस आड करुन त्या-त्या वाडीत जात होता. मात्र, ज्या वाडीची लोकसंख्या ३५ आहे आणि ज्या वाडीची लोकसंख्या १00 पेक्षा अधिक आहे तेथेदेखील केवळ एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.संगमेश्वर तालुक्याच्या कृती आराखड्यामध्ये २८ गावांमधील ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, सध्या पाणीटंचाईची भीषणता दिवसागणिक वाढत आहे. तहानलेल्या जनतेला केवळ एकाच शासकीय टँकरच्या पाण्यावर आपली तहान भागवण्याची वेळ आली आहे.संगमेश्वर तालुक्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता बहुतांशी गावे ही डोंगरदऱ्यांमध्ये वसली आहेत. त्यामुळे डोंगर माथ्यावर असणाऱ्या वाड्या-वस्त्यांना या पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागतो. डोंगराळ भागातील पाण्याचे स्रोत हे उन्हाळ्यात कोरडे होतात. तसेच तालुक्यातील नद्या, नाले हे गाळात रुतल्यामुळे पाण्याची पातळी देखील कमी होते.प्रतिवर्षी उन्हाळा लागण्यापूर्वी पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा बनवला जातो. मात्र, पाण्याचे साठे व स्रोत बळकट करण्यासाठी उपाययोजना केल्या जात नाहीत. अशा उपाययोजनांकडे लोकप्रतिनिधी आणि टंचाईग्रस्त गावात मोडणाऱ्या जनतेने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. आजपर्यंत नळपाणी योजनांसाठी कितीतरी वारेमाप पैसा खर्च झाला. मात्र, त्या नळपाणी योजना कितपत यशस्वी ठरल्या हा संशोधनाचा विषय आहे.१ एप्रिलपासून एका टँकरद्वारे पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये पाचांबे गावातील जखीनटेप, मेढे आणि नेरदवाडीतील ग्रामस्थांसाठी ६ फेऱ्या, पुर्ये तर्फे देवळे गावातील गवळीवाडी, धनगरवाडीतील ग्रामस्थांसाठी टँकरच्या ५ फेऱ्या, बेलारी खुर्द, माची धनगरवाडी, कळंबटेवाडी प्रत्येकी वाडीला ५ व ४ फेऱ्या, कनकाडी गावातील खालची गुरववाडी २ फेऱ्या, कातुडीर्कोंड४ फेऱ्या आणि ओझरे खुर्द माळवतवाडी ४ फेऱ्या या फेऱ्या २२ एप्रिलपर्यंत मारण्यात आल्या होत्या.संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांना २५ तारखेपर्यंत एकाच टँकरने पाणी पुरवठा सुरु होता. मात्र, आता २६ तारखेपासून दुसरा शासकीय टँकर उपलब्ध झाला आहे.संगमेश्वर तालुक्यात सुमारे १३ लघु व मध्यम धरणे पाटबंधारे विभागातर्फे बांधण्यात आली असली, तरी देखील तालुक्यातील २८ गावांतील ३६ ते ४0 वाड्यांतील ग्रामस्थांना ऐन उन्हाळ््यात पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.पाणी टंचाईग्रस्त गावातून पाण्यासाठी टँकरची मागणी वाढली की, गटविकास अधिकारी, तहसीलदार आणि पाणीपुरवठा विभाग या तिघांची संयुक्त पाहणी झाल्यावरच टँकर सुरु करण्याबाबत अहवाल तयार होऊन टँकर सुरु होतो. मात्र, ही पाहणी करण्याची जबाबदारीएकाच विभागाकडे असावी,अशी मागणी होताना दिसत आहे. २७ वाड्यांना टँकरची प्रतीक्षातालुक्यामध्ये सध्या १८ गावांतील ३६ वाड्यांमधून टँकर चालू होण्यासाठी प्रस्ताव प्रशासन स्तरावर आले आहेत. यातील ६ गावे आणि ९ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. लोकमत विशेष पाचांबे, पुर्येतर्फ देवळे, बेलारी खुर्द, कनकाडी, कातुडीर्कोंड आणि ओझरे खुर्द यांचा यामध्ये समावेश आहे. अद्याप २७ वाड्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागत आहे. या एकूण १८ गावांमध्ये बेलारी खुर्द, शृंगारपूर पाचांबे, तुरळ, पुर्येतर्फे देवळे, उजगाव, दाभोळे, कनकाडी, निगुडवाडी, माभळे, निवेखुर्द, भडकंबा, तळवडेतर्फे देवरुख, ओझरे खुर्द, शेणवडे, कुटगिरी, राजवाडी, भिरकोंड या वाड्यांचा समावेश आहे.