शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

या वर्षीही गणवेश उशिराच

By admin | Updated: June 13, 2016 02:12 IST

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व माध्यमांची प्राथमिक, माध्यमिक विद्यालये १५ जूनपासून सुरू होत आहेत.

देहूरोड : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व माध्यमांची प्राथमिक, माध्यमिक विद्यालये १५ जूनपासून सुरू होत आहेत. पाठ्यपुस्तके सर्व मुख्याध्यापक व प्रभारींकडे पोहोचविण्यात आली असून, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना वाटप करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, माध्यमिक विद्यालय व बालवाडीतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश, बूट व मोजेपुरवठा करण्यासाठी बोर्डाने शुक्रवारपासून निविदा प्रक्रियाही सुरू केली असून, ५ जुलैला निविदा उघडण्यात येणार असल्याने गणवेश या वर्षीही उशिरा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सर्वशिक्षा अभियान मोहिमेंतर्गत पहिली ते आठवीत शिकणाऱ्या सर्व मुली, पहिली ते आठवीपर्यंत शिकणारे अनुसूचित जाती व जमातीतील सर्व मुले यांना दर वर्षीप्रमाणे दोन गणवेश देण्यासाठी बोर्डाच्या संबंधित शाळांकडे निधी येत असतो. बोर्डाच्या शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन दर वर्षी स्वत:च्या निधीतून उर्वरित खर्च करून बोर्डाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येत असतात. या वर्षीही बोर्डाच्या सर्व प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय व बालवाडीतील सुमारे दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्यात येणार आहेत. शाळा सुरू झाल्या नसल्याने विद्यार्थ्यांचा निश्चित आकडा उपलब्ध झालेला नाही. त्याकरिता प्रशासनाकडून आवश्यक खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना बूट व मोजेवाटप करण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना दोन तयार गणवेश, बूट व मौजे पुरवठा करण्यासाठी बोर्डाच्या भांडार विभागाच्या वतीने ई-निविदा प्रक्रिया आठ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ३० जूनअखेर निविदा सूचना मागविण्यात आली असून, ५ जुलैला निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या बोर्डाच्या बैठकीत निविदांना मंजुरी मिळाल्यानंतर कामाचे आदेश देण्यात येणार असून, त्यानंतर गणवेश उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत विद्यार्थ्यांना येत्या जुलैअखेर गणवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट होत असून, निविदाप्रक्रिया सुरू होण्यास प्रशासनच जबाबदार असल्याचे मत काही सदस्यांनी व्यक्त केले असून, नाराजी व्यक्त केली आहे. >निविदा प्रक्रियेस विलंब : अधिकाऱ्यांचे दुर्लक्षगेल्या वर्षी निविदा प्रक्रियेस उशीर, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर प्रवेशप्रकिया पूर्ण होऊन विद्यार्थिसंख्या मिळण्यास व मापे घेऊन गणवेश शिलाई कामात वेळ गेल्याने गणवेशवाटप करण्यास उशीर झाला होता. त्यामुळे या वर्षी निविदाप्रक्रिया लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश देण्याचे नियोजन करण्याबाबत वेळोवेळी सांगूनही संबंधित विभाग व वरिष्ठ अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याने गणवेश, बूट व मौजे मिळण्यास उशीर होणार आहे, हे वास्तव आहे. -विशाल खंडेलवाल, अध्यक्ष, शिक्षण समिती, देहूरोड कॅन्टोन्मेंट