शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

यंदा वारीचा मार्ग ‘निर्मल’

By admin | Updated: June 13, 2016 07:03 IST

आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात.

यदु जोशी,

मुंबई- आषाढीनिमित्त संत तुकोबाराय आणि ज्ञानोबा माउलींच्या पालख्यांमध्ये लाखो वारकरी भक्तिभावाने विठूनामाचा गजर करीत मार्गस्थ होतात. या पालख्या निघून गेल्या की, उघड्यावर शौचास बसल्याने अनेक ठिकाणी दुर्गंधी आणि त्यातून रोगराईदेखील पसरते. मात्र, यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून राज्य शासन दोन्ही मार्गांवर ‘निर्मल वारी’ ही अनोखी योजना राबविणार आहे. तुकोबारायांच्या पालखीच्या मुक्कामाच्या १४ ठिकाणी प्रत्येकी ३००, माउलींच्या पालखी मुक्कामाच्या ११ ठिकाणी ५०० शौचालये, पंढरपूरमध्ये एक हजार, तर दोन्ही पालख्या जेथे एकत्र येतात, त्या वाखरीमध्ये ५०० शौचालये बसविण्यात येणार आहेत. तेथे जमणारा मैला जवळच्या सॉलिड ट्रिटमेंट प्लँटमध्ये नेऊन टाकला जाईल. जिथे असे प्लँट नसतील, तिथे एखाद्या शेतामध्ये खड्डा खणून वैज्ञानिक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल आणि त्यातून खत तयार केले जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर अलीकडेच या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. स्वच्छ भारत अभियानचाच हा एक भाग असेल, असे त्यांनी सांगितले. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकात पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. राज्य शासन आणि पुण्यातील सेवा सहयोग ही संस्था यांचा हा संयुक्त उपक्रम असेल. देहू संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीराव मोरे, सेवा सहयोगचे प्रकल्प संचालक नरेंद्र वैशंपायन, माजी खासदार प्रदीप रावत, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय, रा.स्व.संघाच्या महाराष्ट्र प्रांताचे संपर्क प्रमुख संदीप जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नांमधून हा उपक्रम साकारला आहे. गेल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर अशा शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.>१० हजार स्वयंसेवकांची फळीवारकऱ्यांनी या शौचालयांचाच वापर करावा, असे आवाहन प्रत्येक ठिकाणी करण्यात येणार आहे. कोणीही उघड्यावर शौचास जाऊ नये, तसेच शौचालयांची व्यवस्था नीट व्हावी, यासाठी प्रत्येक ठिकाणी २०० स्वयंसेवक तैनात असतील. अशा १० हजार स्वयंसेवकांची फळी तयार करण्यात आली आहे. गेल्या वर्षी लोणी व यवत येथे आणि काही दिवस पंढरपूरमध्येही प्रायोगिक तत्त्वावर या शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.