शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

यंदाच्या हंगामात तांदळाचे ‘बंपर’ उत्पादन होणार

By admin | Updated: January 8, 2015 01:34 IST

यंदा मोठ्या प्रमाणात आलेले तांदळाचे उत्पादन व देशातून बंद असलेली निर्यात यामुळे देशभरात तांदळाचा ‘बफर स्टॉक’ झाला आहे.

विजयकुमार सैतवाल - जळगावयंदा मोठ्या प्रमाणात आलेले तांदळाचे उत्पादन व देशातून बंद असलेली निर्यात यामुळे देशभरात तांदळाचा ‘बफर स्टॉक’ झाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा तांदळाचे भाव घसरून ‘बासमती’ही सामान्यांच्या आवाक्यात येत आहे. शिवाय यंदा २५ ते ३० नवीन प्रकारच्या तांदळाला पसंती दिसून येतआहे.गेल्यावर्षीच्या तुलनेत तांदूळ बाजारात यंदा पूर्णत: उलट चित्र आहे. गेल्या वर्षी देशातून वाढती निर्यात व अतिपावसाने उत्पादनात आलेली घट यामुळे तांदळाचे भाव प्रचंड वाढले होते. त्यामुळे ग्राहकांना त्याचा फटका बसला होता. यावर्षी मात्र कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, पंजाब, हरीयाणा, उत्तर प्रदेश तसेच महाराष्ट्रातील चंद्रपूर, गोंदिया, कोकण या तांदूळ उत्पादक सर्वच प्रदेशात तांदळाचे विक्रमी उत्पादन झालेआहे. शिवाय देशातून तांदळाची निर्यात बंद असल्याने देशभर मागणीच्या तुलनेत सव्वापट तांदळाचा साठा उपलब्ध आहे. याचा थेट परिणाम होऊन तांदळाचे भाव यंदा सरासरी ५०० ते ७०० रुपये प्रती क्विंटलने कमी झाले आहे. शिवाय बासमती तांदूळही ३००० ते ३५०० रुपये प्रती क्विंटलने खाली आला आहे. भाव कमी झाल्याने तांदळाला मागणी वाढली असून जो तांदूळ जास्त भावामुळे सामान्यांच्या आवाक्यात नव्हता त्याचीही खरेदी वाढून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात ‘चॉईस’ उपलब्ध आहे. यात २५ ते ३० नवीन प्रकार ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. ज्यामध्ये बासमतीमधील डी.पी. बासमती, पुसा बासमती, टेरीकॉट बासमती तसेच आंबेमोहर व इतर प्रकारच्या तांदळाचा समावेशआहे. यातील पुसा बासमती जो गेल्या वर्षी ९० ते १०० रुपये प्रती किलोवर गेला होता तो यंदा ४० ते ४५ रुपये प्रती किलोवर आला आहे. आंबेमोहरचेही तसेच असून गेल्या वर्षी तो ६५ रुपये प्रती किलोवर होता मात्र यंदा तो ४२ ते ५० रुपये प्रती किलोवर आला आहे. यावरुन तांदळातील घसरणीचे चित्र लक्षात येते.आवाक्यात आलेल्या तांदळातील डी.पी. व पुसा बासमती या तांदळाची लांबी शिजविल्यानंतर सव्वा दोन पट वाढते. त्यामुळे आता प्रचंड उत्पादनामुळे सामान्य ग्राहकही बासमतीचा आस्वाद घेऊ शकतात. बाजारात मोठ्या प्रमाणात तांदळाची आवक असल्याने ग्राहकांसाठी तांदूळ खरेदीची हीच योग्यवेळ असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.तांदळाचे भरघोस उत्पादन येण्यासह सध्या देशातून त्याची निर्यात तर बंद आहेच शिवाय तांदळाची खरेदी करणाऱ्या नाफेड, भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) या संस्थांसह खाजगी कंपन्यांकडूनही तांदळाची अद्याप खरेदी सुरु झालेली नाही. त्यांच्याकडून खरेदी सुरु झाली तर तांदळाच्या भावात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या मोठ्या प्रमाणात आवक असल्याने बासमती तांदूळसुद्धा सामान्य ग्राहकाच्या आवाक्यात आहे. गरजेनुसार उपलब्धताएकत्र कुटुंबपद्धत नाहीशी होऊ लागल्याने कुटुंबाचा आकार लहान होत आहे. त्यामुळे धान्यासह सर्वच वस्तूंमध्ये छोट्या पॅकींगला मागणी वाढीला लागली. त्यानुसार तांदुळाचेही पाच किलोमध्ये सुद्धा पाकीट उपलब्ध आहे. आवश्यकता आहे तोच घेतो जुना तांदूळज्या ग्राहकाला तांदुळाचा लगेच वापर करायचा आहे, तोच जुना तांदूळ खेरदी करतो. अन्यथा बहुतांश ग्राहक याच काळात नवीन तांदळाची खरेदी करुन तो जुना होऊ देतात व नंतर त्याचा वापर करतात.बासमती ९० ते १२०पुसा बासमती४० ते ६५टेरीकॉट बासमती३२ ते ३५आंबेमोहर४२ ते ५०सुगंधी चिनोर२८ ते २९कालीमुछ३४ ते ३५कोलम३६ ते ३७लच्छकारी कोलम४० ते ४२भाव प्रति किलो